कुडचिरेत 'पाण्याचा' प्रश्न पेटण्याची शक्यता; जलवाहिनीतून पाणी वळविण्यास विरोध

कोणत्याही परिस्थितीत गावातील जलवाहिनीतून पाणी अन्यत्र वळविण्यास देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
Kudchire Residents
Kudchire ResidentsDainik Gomantak
Published on
Updated on

चोली: वन-म्हावळींगे पंचायत क्षेत्रातील कुडचिरे (Kudchire) गावातील जलवाहिनीतून पाणी वळविण्यास स्थानिकांचा प्रखर विरोध असून, गुरुवारी सायंकाळी स्थानिकांनी नवीन जलवाहिनीचे काम रोखले. कोणत्याही परिस्थितीत गावातील जलवाहिनीतून पाणी अन्यत्र वळविण्यास देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे कुडचिरे गावात पाण्याचा प्रश्न पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंबंधी ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडचिरे गावात पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गावात टाकण्यात आलेल्या जलवाहिनीतून आधीच गावात सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. त्यातच धाट-धनगरवाडा येथे गावातील जलवाहिनीला नवी जलवाहिनी जोडून पाणी वाठादेव-डिचोलीच्या दिशेने नेण्याचा प्रस्ताव आहे.

Kudchire Residents
Goa: दुकानात वीज कोसळल्याने नुकसान

नवीन जलवाहिनीचे कामही जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर असून, कुडचिरेतील जलवाहिनीला नवी जलवाहिनी जोडण्याचे काम बाकी आहे. हे काम करण्यासाठी संबंधित ठेकेदाराचे कामगार जेसीबीसह आले असता, स्थानिकांनी काम करण्यास आक्षेप घेतला. पोलिसांनाही पाचरण करण्यात आले. मात्र कुडचिरेवासिय आपल्या भूमिकेशी ठाम राहिले. अखेर काम बंद करण्यात आले. स्थानिक उपसरपंच प्रकाश गावकर, उमेश गावकर, माजी पंच भागो वरक यांच्यासह 25 हून अधिक नागरिक जमले होते.

तर पाण्यासाठी मारामारी

आधीच कुडचिरे गावात पाण्याची समस्या आहे. गावात सुरळीतपणे पाणी पुरवठा होत नाही. त्यातच या जलवाहिनीतून पाणी अन्यत्र वाळविले, तर गावात पाण्यासाठी मारामारी होण्याची भिती आहे. असे भागो वरक, किशोर गावकर आदी ग्रामस्थांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com