Porvorim Crime News: गुरुद्वारातील फंडपेटी फोडणाऱ्या चोरट्याला अखेर अटक

तीन दिवसाच्या आत प्रकरणाचा छडा लावण्यात पर्वरी पोलिसांना यश
Porvorim Police arrested accused
Porvorim Police arrested accused Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Porvorim Crime News: बेती येथील गुरुद्वारा चोरीप्रकरणाचा छडा लावण्यात अखेर पर्वरी पोलिसांना यश आले आहे. पर्वरी पोलिसांनी याप्रकरणी संशयीतास दिल्लीतून अटक केली आहे. तीन दिवसाच्या आत संशयिताला अटक करत प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला.

Porvorim Police arrested accused
Valpoi : वाळपई नगरपालिकेची बेकायदेशीर बांधकामाविरुद्ध धडक कारवाई

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी गुरुद्वाराच्या दरबार हॉलमध्ये प्रवेश करत दानपेटी फोडून 4 लाख 50 हजार रुपयांची रक्कम लंपास केली अशी तक्रार 18 जानेवारी रोजी गुरुद्वाराचे अध्यक्षांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पर्वरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला.

Porvorim Police arrested accused
Jio 5G In Goa : पणजीत आजपासून जिओची 5G सेवा सुरू

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विविध पथके तयार करून जवळपास तीन दिवस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची तपासणी केली. या तपासणीत दोन अज्ञात आरोपींची ओळख पटली. त्या आरोपींपैकी एक 35 वर्षीय जस्प्रीत सिंग पश्चिम दिल्लीचा चांद नगर भागातील रहिवाशी असल्याचे आढळून आले.

पर्वरी पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले. दिल्ली पोलिसांच्या मदतीने संशयिताला दिल्लीत अटक करण्यात आली त्यानंतर आरोपीला गोव्यात आणण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim Elevated Road
Porvorim elevated road traffic
Porvorim Elevated Road
Srinivas Naik Shooting
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com