Porvorim Project: पर्वरीतील एलिव्हेटेड हायवे कॉरिडॉरचा प्रकल्प लांबला, खर्चातही होणार मोठी वाढ

Porvorim Elevated Corridor Project: एलिव्हेटेड हायवे कॉरिडॉरचा प्रकल्प लांबला
porvorim elevated corridor
porvorim elevated corridorDainik Gomantak
Published on
Updated on

Porvorim,Goa

पर्वरी: पर्वरीतील ६४० कोटी रुपयांचा एलिव्हेटेड हायवे कॉरिडॉरचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला होता, मात्र आता या बांधकामाचा कालावधी आणि खर्च दोन्हीमध्ये वाढ होणार आहे.

बांधकाम सुरु झाल्यांनतर केलेल्या सविस्तर भूगर्भीय तपासणीमधून खडकांचा थर पूर्वीच्या अपेक्षेपेक्षा जास्त खोल असल्याची माहिती मिळाली. २०- २५ मीटर पर्यंत पाईलिंगसह प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती.

मात्र आता भूगर्भशास्त्रीय अभ्यासातून ४० मीटर खोलपर्यंत पायलिंग करणे आवश्यकता असल्याचे आढळून आले आहे. परिणामी प्रकल्पाचा खर्च किमान ५० कोटी रुपयांनी वाढण्याची अपेक्षा असून प्रकल्प बांधणीसाठी लागणारा कालावधी पूर्वीच्या अंदाजापेक्षा जास्त असेल.

porvorim elevated corridor
Goa Crime: एकीकडे कवटी दुसरीकडे आढळला शीर नसलेला महिलेचा मृतदेह, दोन घटनांचे रहस्य

पर्वरीतील भाग हा पठाराचा असल्यामुळे आजूबाजूची जागा देखील एक सामान असेल असे ग्राह्य धरण्यात आले होते, मात्र खडकांचा थर अपेक्षेपेक्षा खोल असल्याने आता पायलिंगच्या प्रकारामध्ये बदल करावे लागणार आहेत.

पर्वरीत सुरु असेलेलया प्रकल्पामुळे वाहतूक सर्व्हिस रोडवर हलवण्यात आली आहे. प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या चहणीनंतर उत्तर गोवा जिल्लाधिकाऱ्यांकडून ही अधिसूचना जारी करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com