Mapusa News : उड्डाण पुलाचे काम पर्वरी येथे रोखले; कंत्राटदार-प्रशासनात समन्वयाचा अभाव

Mapusa News : याविषयी प्रशासकीय विभागांकडून माहिती जाणून घेण्याकरिता आज पाहणी केली. यावेळी कंत्राटदार व प्रशासकीय विभागांत समन्वयाचा अभाव दिसून आला.
Mapusa
MapusaDainik Gomantak

Mapusa News :

म्हापसा-पणजी महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सांगोल्डा ते पर्वरीदरम्यान साडेपाच किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल (एलिव्हेटेड कॉरिडॉर) बांधण्यात येणार आहे.

या पुलाच्या बांधकामासंदर्भात आज (ता. २०) पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी कंत्राटदार तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी कंत्राटदार आणि प्रशासकीय विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे प्रकर्षाने जाणवले.

त्यामुळे उड्डाण पुलाच्या आराखड्याचे सादरीकरण केल्यानंतरच बांधकामाला सुरवात करावी, असे निर्देश मंत्र्यांनी कंत्राटदाराला दिले. याविषयी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मंत्री खंवटे म्हणाले की, वाहतुकीचे व्यवस्थापन किंवा इतर बाबतीत विचारविनिमय न करताच, कंत्राटदाराने उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू केल्याने स्थानिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

Mapusa
Goa's Top News: गोव्याची कुणबी साडी GI मानांकनाच्या शर्यतीत, मोपाला बहुमान आणि गोव्यातील इतर ठळक बातम्या

याविषयी प्रशासकीय विभागांकडून माहिती जाणून घेण्याकरिता आज पाहणी केली. यावेळी कंत्राटदार व प्रशासकीय विभागांत समन्वयाचा अभाव दिसून आला. त्यामुळे सर्व उपाययोजना तसेच पर्यायी बाबींचा विचार होत नाही, तोवर बांधकामास सुरवात करू नये, असे निर्देश कंत्राटदाराला दिले आहेत.

मंत्री खंवटे म्हणाले की, या एलिव्हेटेड कॉरिडॉरचे अंतर कमी असले तरी, सर्व गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. उड्डाण पुलाच्या कामावेळी वाहतूक व्यवस्थापन महत्त्वाचा मुद्दा असेल. परंतु वाहतूक वळविण्यासंदर्भातील माहिती मामलेदारांना दिलेली नाही. तसेच अवजड वाहनांच्या पर्यायी मार्गाचा विचार होणे आवश्यक आहे. तसेच वाहतूक, मलनिस्सारण, जलस्रोत व वीज विभागांशी समन्वय साधलेला नाही. या गोष्टींची पूर्तता केल्यास सर्वसामान्यांना उड्डाण पुलाच्या कामाची झळ बसणार नाही, यावर मंत्र्यांनी

जोर दिला.

आजवर आम्ही सर्वांना विश्वासात घेऊनच विकासकामे राबविली आहेत. जर योग्य आराखडा व व्यवस्थापनाशिवाय काम सुरू केल्यास नंतर लोक विकासकामांच्या नावाने पुन्हा सरकारलाच नावे ठेवतील, असेही मंत्री खंवटे म्हणाले.

उद्या आराखडा सादरीकरण

उड्डाण पुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला भौगोलिक अभ्यास करून एलिव्हेटेड कॉरिडॉर अंमलात आणण्याबाबत आराखडा देण्यास सांगितले आहे. कंत्राटदाराने येत्या शनिवारी (ता.२२) आराखड्याचे सादरीकरण करतो, असे आश्वासन दिले आहे. यावेळी मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित असतील, अशी माहिती मंत्री खंवटे यांनी माध्यमांना दिली.

सर्व्हिस रोड हवाच

पर्वरी उड्डाण पुलाच्या कामावेळी वाहतुकीला कमीत कमी व्यत्यय होईल, हे पाहिले पाहिजे. कंत्राटदाराने विद्यमान सर्व्हिस रोडना बाधा पोचवू नये, असे निर्देश दिले आहेत. तसेच कंत्राटदाराला भौगोलिक अभ्यास करण्यास सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com