Goa's Top News: गोव्याची कुणबी साडी GI मानांकनाच्या शर्यतीत, मोपाला बहुमान आणि गोव्यातील इतर ठळक बातम्या

Goa Today's 19 June 2024 Live News: गोव्यातील क्रीडा, राजकारण, पर्यटन, गुन्हे यासह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडी.
Manohar International Airport At Mopa Goa
Manohar International Airport At Mopa GoaGOX Twitter

Goa News: 'त्या' मगरीला पकडण्यासाठी वन खात्याने लावला सापळा

व्हाळशी-डिचोली येथील तळ्यातील मगरीला पकडण्यासाठी वन खात्याने लावला सापळा. लोकवस्तीजवळील तळ्यात संचार करणाऱ्या मगरीची दहशत वाढल्याने लोक भयभीत. मंगळवारी दिवसाढवळ्या मगरीने घेतला होता श्वानाचा बळी.

Goa Police: गोवा पोलिसांचे ऑपरेशन राखण

Mopa Airport: मोपाला बहुमान! जगातील 100 विमानतळाच्या यादीत स्थान

स्कायट्रॅक्सच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगातील १०० विमानतळाच्या यादीत स्थान. या यादीत स्थान मिळवणाऱ्या भारतातील पाच विमानतळापैकी मोपा विमानतळ एक.

Kunbi Sarri: कुणबी साडी आणि कापड आता जीआय मानांकनाच्या शर्यतीत

राज्य विज्ञान-तंत्रज्ञान मंडळाकडून कुणबी साडी आणि कापडाची जीआय मानांकनासाठी शिफारस. यापूर्वी गोव्यातील दहा वस्तूंना जीआय मानांकन मिळाले आहे.

Dharbandora: धारबांदोडा येथील ओहोळात अज्ञाताने टाकल्या मृत ब्रॉयलर कोंबड्या

धारबांदोडा येथील ओहोळात अज्ञाताने टाकल्या मृत ब्रॉयलर कोंबड्या, पाणी दुषीत झाल्याने स्थानिक पंचायतीकडून कारवाईची मागणी.

Theft In Siolim: शिवोलीत ४.५० लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

शिवोली येथील एका व्हिलातून सुमारे ४.५० लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी हणजूण पोलिसांकडून अज्ञाता विरोधात गुन्हा नोंद.

Shirgao Minning Block-2: शिरगाव खाण ब्लॉक-2  जनसुनावणी, बहुतेकांचे मायनिंगला समर्थन

खाणीसंबंधीची जनसुनावणी म्हणजे जनतेची थट्टा. पर्यावरणप्रेमी रमेश गावस यांचा आरोप. शिरगाव खाण ब्लॉक-2 अंतर्गत खाणीच्या जनसुनावणीवेळी रमेश गावस यांना मत मांडण्यास सरकारी अधिकाऱ्यांनी घेतला आक्षेप. जनसुनावणी आटोपली. लोकांचा अल्प प्रतिसाद. बहुतेकांचे मायनिंगला समर्थन.

Goa Fraud Case: विक्री केलेल्या जमिनीची पुन्हा विक्री करुन 55 लाखांची फसवणूक

दुसऱ्याला विक्री केलेल्या जमिनीची पुन्हा विक्री करुन 55 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी विजया प्रभू देसाई आणि देवेंद्र प्रभू देसाई (दोघेही रा. धारगळ, पेडणे) यांच्या विरोधात पेडणे पोलिसांत गुन्हा. प्रकाश नाईक (रा. म्हापसा, बार्देश) यांनी दाखल केली तक्रार. खरेदीनंतर 2012 सालीच दुसऱ्याच्या नावे नोंदणी व मुद्रांक विभागाकडे नोंदणी झाल्याचे उघड.

Goa Accident: व्हाळशी जंक्शनवर पहिला अपघात, दोघे जखमी

डिचोली बगलमार्गावरील व्हाळशी जंक्शनवर पहिला अपघात. सुमो जीपची धडक बसल्याने मोटारसायकलवरील चालकासह दोघे जखमी. गेल्या 6 रोजी बगलमार्गाचे झालेय लोकार्पण.

Bike Theft Case: आल्तिनो - पणजी येथील इलेक्ट्रिक दुचाकी चोरी प्रकरणी दोघांना अटक

आल्तिनो - पणजी येथील इलेक्ट्रिक दुचाकी चोरी प्रकरणी पणजी पोलिसांनी बसंत मेजर (19, डिचोली) व बिशाल गुरूंग (24, साखळी) या दोघा तरुणांना अटक केली व त्यांच्याकडून चोरलेली दुचाकी जप्त केली.

Shirgao Minning Block-2: शिरगाव खाण ब्लॉक-2 अंतर्गत खाणीसाठी आज जनसुनावणी

शिरगाव खाण ब्लॉक-2 अंतर्गत खाणीसाठी आज जनसुनावणी. दहा वाजेपर्यंत नोंदणी प्रक्रियेला सुरवात नाही. अद्याप तरी लोकांचा अल्प प्रतिसाद. डिचोलीत झांट्ये कॉलेजच्या खेळा संकुल सभागृहात होणार जनसुनावणी.

Crocodile Attack Dog: मगरीच्या हल्ल्यात कुत्र्याचा बळी

मगरीच्या हल्ल्यात कुत्र्याचा बळी. डिचोलीत भर लोकवस्तीजवळील नैसर्गिक तळ्यात संचार करणाऱ्या मगरीने तळ्याकाठी असलेल्या पाळीव कुत्र्याला पाण्यात खेचले. स्थानिक भयभीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com