Panaji News : पणजी, जुन्या कागदपत्रांचे डिजिटलीकरण करणे ही काळाची गरज आहे. कारण पुढील पिढीला संशोधनासाठी हा दस्तावेज उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरू शकतो.
त्यामुळे पोर्तुगालने गोव्यासंबंधित संग्रहित केलेला दस्तावेज गोव्याला द्यावा, असे आवाहन पुराभिलेख मंत्री सुभाष फळदेसाई यांनी कले. ते गोवा विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील सभागृहात उच्च शिक्षण संचालनालय, गोवा विद्यापीठ आणि इन्फॉर्मेशन रिट्रीव्हल सोसायटी ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
‘डिजिटल दृष्टिकोनातून गोव्यात पोर्तुगिजांची उपस्थिती’ या विषयावरती ही कार्यशाळा आयोजित केलेली होती. यावेळी मंचावर प्रो. पावलो, प्रो. ॲना, प्रो. मुझुमदार, डॉ. नीलेश फळदेसाई, डीन ज्योती पवार, प्रो. रामराव वाघ, प्रो. रामदास करमली आदी मान्यवर उपस्थित होते.
पोर्तुगाल-भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारतीलडिजिटल स्वरूपात किंवा छापील स्वरूपात पोर्तुगालने हे दस्तावेज भारताला परत दिले तर पर्यायाने भारत आणि पोर्तुगाल द्विपक्षीय संबंध सुधारतील, असेही मंत्री सुभाष फळदेसाई यावेळी म्हणाले.
गोव्यातील सर्व दस्तावेजांचे जतन करून संवर्धन करणे ही आमची जबाबदारी आहे. गोवा सरकारही सर्व दस्तावेजांचे डिजिटलीकरण करण्याबाबत आग्रही आहे, असेही फळदेसाई यावेळी म्हणाले.
लिस्बन लायब्ररीत महत्त्वपूर्ण दस्तावेज
पोर्तुगिजांनी गोव्यासंबंधित संशोधनात्मक दस्तावेज लिस्बन लायब्ररीत जपून ठेवलेला आहे. अतिशय शिस्तबद्धरित्या जपून ठेवलेले हे दस्तावेज गोव्याचे आहेत. त्यामुळे ते गोव्याला मिळालेच पाहिजेत, असेही मंत्री फळदेसाई यावेळी म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.