Portuguese Empire: वालीस यांच्या 'शॅडोस ॲण्ड लाईट्‍स ऑफ पोर्तुगीज एम्पायर' आत्मवृत्ताचे प्रकाशन

Goa Portugal History: एडगर वालीस यांच्या ‘शॅडोस ॲण्ड लाईट्‍स ऑफ पोर्तुगीज एम्पायर’ या आत्मचरित्रपर पुस्तकात त्यांच्या जीवनासंबंधीच्या घटना असल्या तरी त्यात पोर्तुगाल, आंगोल व गोवा जोडलेला आहे.
Goa Portugal History
Portuguese EmpireDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: एडगर वालीस यांच्या ‘शॅडोस ॲण्ड लाईट्‍स ऑफ पोर्तुगीज एम्पायर’ या आत्मचरित्रपर पुस्तकात त्यांच्या जीवनासंबंधीच्या घटना असल्या तरी त्यात पोर्तुगाल, आंगोल व गोवा जोडलेला आहे व गोवेकराचे मन त्यात सतत जाणवते, असे मत ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी येथे व्यक्त केले.

फुंदासाव ओरियंट येथे झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात नायक प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले : पोर्तुगाल गोव्यामध्ये अंतर खूप असले तरी आमच्यासाठी तो देश परका नाही. तो देश आमच्या आडनावात आहे, कौटुंबिक इतिहासामध्ये आहे. पोर्तुगाल शब्द कोकणी-मराठीत आहेत. आपल्या स्थापत्यात ती भाषा आहे, संगीत, अन्न, चर्च व साहित्यात आहे.

Goa Portugal History
Goa Women Reservation: गोवा विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण द्या! अधिवेशनात ठराव मंजूर करा, महिला आघाडीची मागणी

आमची जुनी छायाचित्रे, पत्रे-कागदपत्रे व १९६१पासून येथे वास्तव्य करणाऱ्या प्रत्येकाच्या स्मरणात आहे. अशा पुस्तकांचे अनुवाद व्हायला हवेत व गोवेकरांनी जुन्या आठवणी लिहून काढायला हव्यात. पुस्तकाचे प्रकाशक फ्रेड्रिक नोरोन्हा यांनी पुस्तकात लेखकाने प्रामाणिक प्रसंग लिहिले आहेत व लेखक वालीस पोर्तुगाल व आंगोलच्या क्रांतिकारी लढ्यात सामील होते; त्यातून त्यांचे जीवन घडले आहे, असे प्रतिपादन केले.

एडगर वालीस यांचा जन्म गोमंतकीय कुटुंबात आंगोल येथे झाला. ते १७ वर्षांचे असताना शिक्षणासाठी पोर्तुगाल येथे गेले व तेथेच स्थायिक झाले. वास्तविक ते ताळगाव येथील असून दरवर्षी ते गोव्यात येत असतात. त्यांच्या बहीण सीता वालीस या आंगोलच्या क्रांतीपर्वात सहभागी झाल्या होत्या व २७ वर्षांच्या असताना त्यांची प्रतिक्रांतिकारी फौजांनी हत्या केली. वालीस हे पोर्तुगालमधील गोवा संस्थेचे अनेक वर्षे अध्यक्ष होते.

Goa Portugal History
Goa Stray Dogs: 1.5 लाख भटके कुत्रे, 16 लाख लोकसंख्या; गोव्यात सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर

सालाझार यांच्या काळातील पोर्तुगाल आता नाही व त्यावेळचा गोवाही अस्तित्वात नाही. तरीही युरोपात आता उजव्या शक्ती उदयास येत आहेत, अशी खंत वालीस यांनी व्यक्त केली. ‘फुंदासाव’चे संचालक डॉ. पावलो गोमीश यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com