Goa News : तिथे बंदर कप्तान खाते परवानगी देऊ शकत नाही

खंवटे : मिरामार जलक्रीडाप्रकरणी स्पष्टीकरण
Rohan Khaunte
Rohan Khaunte Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : मिरामार येथे बेकायदेशीररीत्या व्यवसाय करणाऱ्या बोट मालकांवर पर्यटन खात्याने बुधवारी कारवाई केली आहे. परंतु नदीत व्यवहार करण्याची परवानगी बंदर कप्तान खात्याने दिल्याचे बोट मालकांकडून सांगण्यात आले. यावर पर्यटन उपक्रमाशी निगडित परवानगी इतर कुठल्याही खात्याला नाही, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले. पर्वरी मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते.

‘सात बोट मालक असून यातील काहींवर दंडात्मक कारवाई झाली आहे, तर इतरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पर्यटन खात्यात सुनावणी होईपर्यंत त्यांना व्यवहार करण्यासाठी तात्पुरती परवानगी दिली आहे. गोमंतकीय व्यावसायिकांवर अन्याय होणार नाही, याची खात्री घेतली जात आहे. परंतु नियमांचे पालन करून व्यवसाय झाला पाहिजे’, असे खंवटे म्हणाले.

बुधवारी कारवाई झाली होती, तेव्हा बोट्समध्ये सुरक्षा उपकरण नव्हते. तसेच पर्यटन खात्याने उपक्रमासाठी मिरामार समुद्रकिनारा अधिसूचित केलेला नाही. फक्त अधिसूचित केलेल्या ठिकाणी उपक्रम करता येईल, या हेतूने जेटी धोरण आणले आहे. परंतु काही जण कोळसा वाहतुकीसाठी आणली जात असल्याचे विधाने करत आहे. पर्यटन उपक्रमांमध्ये असलेला बेकायदेशीरपणा थांबवण्याच्या उद्देशाने हे धोरण आणले जात आहे, असे खंवटे यांनी स्पष्ट केले.

गैरप्रकार रोखणार

पर्यटन हंगामात गोमंतकीयांना व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे, परंतु नियमांचे पालन होणे आवश्‍यक आहे. आज जलक्रीडा उपक्रमात सुरू गैरप्रकार थांबून एक खिडकी प्रणाली जेटी धोरणाच्या माध्यमातून आणली जाणार आहे, असे खंवटे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Illegal Activities At Goa Tourist Places
Goa CGP Movement
Goa High Court Minor Child
Quelossim Cuthali Tourism Project
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com