Chorla Ghat Bad Road Condition
वाळपई: सबका साथ सबका विकास ही संकल्पना देशात सुरू आहे. सर्वांना बरोबर घेऊन सर्वांगीण विकासाचा मेळ घालायचा, पण खरोखरच असे होते काय? हा संशोधनाचा विषय बनला आहे. याचा प्रत्यय सत्तरी तालुक्यातील चोर्ला घाटातून बेळगावला जाताना वाहनचालकांना येत आहे.
चोर्ला घाटातून गोवा हद्द पार केल्यानंतर कर्नाटकच्या हद्दीत चोर्ला ते कणकुंबी, जांबोटीपर्यंतचा रस्ता खड्डेमय बनला आहे. या रस्त्यावरून दुचाकीस्वारांना तर अक्षरशः धूळ खात प्रवास करावा लागत आहे.
या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडल्याने दुचाकी चालकांची त्रेधातिरपिट उडते. गोवा सरकारने या स्थितीची दखल घेत कर्नाटक सरकारला या रस्त्याविषयी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. कारण सध्या हा रस्ता गोवेकरांसाठी त्रासदायक ठरत आहे.
लोकसभा निवडणुकावेळी कणकुंबी, जांबोटी भागातील रस्त्यातील खड्डे बुजविले होते व त्यावेळी रस्ता तात्पुरता चांगला झाला होता, पण आता कणकुंबी भागातील रस्त्यातून जाणे जीवघेणे ठरत आहे. गोवा सरकारने कर्नाटक सरकारकडे तत्काळ पाठपुरावा करून हा रस्ता हॉटमिक्स करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणारे गोव्यातील वाहनचालक करीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.