Goa News: बैल मरून पडल्याने पाणी झाले दूषित; वरचावाडातील विहिरीची दुरवस्था

Goa News: वरचावाडातील विहिरीची दुरवस्था झाल्यामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे.
Well
WellDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa News: सडये पंचायत क्षेत्रातील वरचावाडा परिसरातील एकमेव जुन्या विहिरीची दुरवस्था झाली असून आठवडाभरापूर्वीच कठड्याअभावी एक झुंजीचा बैल पाय घसरून येथील विहिरीत पडल्याने जबर जखमी झाला. दुर्दैवाने तो बैल विहिरीतच तडफडून मरण पावल्याने सध्या विहिरीचे पाणी अत्यंत प्रदूषित झाले आहे.

या घटनेमुळे वस्तीतील लोकांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय झाली असून तात्काळ या विहिरीची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी सह्यांनिशी पंचायत कार्यालयात अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, अंदाजे दीडशे ते दोनशे वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या येथील विहिरीचे पाणी वरचावाडा सडये येथील बहुतेक ग्रामस्थ नियमित पिण्यासाठी वापरत.

गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून गावात नळाची सोय झाली असली तरी नैसर्गिक झरा लाभलेल्या या विहीरीचे पाणी आजही स्थानिक लोक घरातील देवकृत्ये तसेच पिण्यासाठी वापरतात,असे ज्येष्ठ नागरिक शाम मांद्रेकर यांनी सांगितले.

ही विहीर खाजगी जमिनीत असून विहीर मालक सध्या कामानिमित्त कुटुंबीयांसह धुळेर येथे वास्तव्यास आहे. त्यामुळे विहिरीच्या दुरुस्ती, स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. सध्या विहिरीत मोठ्या प्रमाणात झुडपे वाढलेली आहेत.

Well
Goa: केरी-फोंडा येथे ‘कोमप’चे शेकोटी साहित्य संमेलन

स्थानिक पंच मांद्रेकर तसेच इतर सदस्यांच्या मदतीने हा प्रश्न सोडवू. मालकाची ना हरकत मिळताच विहीर दुरुस्तीकाम पंचायत निधीतून किंवा आमदरांच्या मदतीने हाती घेतले जाईल. -दीपा पेडणेकर, सरपंच

लहानपणापासून घरात पिण्यासाठी याच विहिरीचे पाणी आम्ही वापरतो. या विहिरीशी आमचे जिव्हाळ्याचे नाते आहे. विहिरीची दुरवस्था झाली असून स्थानिक पंच या नात्याने विहीर मालकाशी दुरुस्तीसाठी चर्चा करणार. -सचिन मांद्रेकर, पंच सदस्य

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Akhada Water Supply
Goa Water Storage
Goa Rainfall Deficit 2026
 Shappora River water Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com