ओंडक्यांमुळे पूल बनला असुरक्षित

साकोर्डात रस्त्यांवर साचले कचऱ्याचे ढीग
Tambadisurla
TambadisurlaDainik Gomantak
Published on
Updated on

तांबडीसुर्ला: साकोर्डा भागात संततधार अतिवृष्टीमुळे रगाडा नदी व ओहोळाच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ होऊन पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच पुलावर पाण्याच्या प्रवाहाने एक ओंडका वाहत आला असून तो अरुंद पुलावर आडवा आल्याने वाहतुकीसाठी अडथळा होत आहे. हा ओंडका अपघातासही कारणीभूत ठरू शकतो.

(pool is unsafe in tambadisurla)

Tambadisurla
राज्यात रेड अलर्ट जारी; मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा

मंगळवारी संध्याकाळी जोरदार पावसामुळे रगाडा नदी दुथडी भरून वाहात होती. त्यातच पाण्याच्या प्रवाहात मोठमोठे झाडांचे ओंडके वाहून येत होते.

देऊळमळ-साकोर्डा येथील दोन्ही पूल पाण्याखाली गेले होते. अन्य एका पुलावर पाण्यातून कचरा, लहान-मोठे लाकडाचे तुकडे वाहून आले आहेत. या मार्गावर वाहतुकीची वर्दळ सुरू असल्याने ओंडके, तसेच इतर कचरा हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचीमागणी होत आहे.

झाडामुळे धोका

अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जमीन भुसभुशीत होऊ लागल्याने झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडू लागले आहेत. साकोर्डा-मोले येथे जुन्या पदपुलाजवळ एक झाड मुख्य रस्त्यावर कलले आहे. त्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. संभाव्य धोके टाळून पूल व रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com