Pooja Naik: ‘सॉरी’वरच प्रकरण मिटवलं! कोलवाळ तुरुंग प्रशासनाचा घोळ; पूजा नाईक बेकायदा बाहेर

Pooja Naik Cash for Job Case: पूजा नाईक हिला एका प्रकरणात जामीन मिळाला होता. मात्र तिच्याविरुद्ध इतर खटले प्रलंबित असल्याने तिला न्यायालयीन कोठडीतच ठेवणे आवश्यक होते.
Pooja Naik Cash for Job Case
Pooja NaikDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या पूजा नाईक हिला एका खटल्यातील जामिनाच्या आधारावर कोलवाळ कारागृहातून २४ तासांसाठी बाहेर सोडण्याची गंभीर चूक केवळ ‘माफ करा, चूक झाली’ या शब्दांवर माफ करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २४ फेब्रुवारी रोजी तिला कारागृहाबाहेर सोडण्यात आले होते आणि परत बोलावल्यावर ती २५ फेब्रुवारीला कारागृहात दाखल झाली.

कारागृह प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार, पूजा नाईक हिला एका प्रकरणात जामीन मिळाला होता. मात्र तिच्याविरुद्ध इतर खटले प्रलंबित असल्याने तिला न्यायालयीन कोठडीतच ठेवणे आवश्यक होते. तरीही आवश्यक शहानिशा न करता तिला बाहेर सोडण्यात आले. त्याच दिवशी सायंकाळी कैद्यांची मोजदाद करताना एक कैदी कमी आढळल्याने ही बाब उघडकीस आली.

चौकशीअंती पूजा नाईक कारागृहात नसल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासात तिला जामीनाच्या आदेशावर कारागृहातून सोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तिला तातडीने परत बोलावण्यात आले. ती दुसऱ्या दिवशी सकाळी परत आली; मात्र तिला पुन्हा कारागृहात दाखल करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला. अखेरीस कागदपत्रांत बदल करून तिला दुपारी पुन्हा कारागृहात दाखल करण्यात आले.

Pooja Naik Cash for Job Case
Pooja Naik: पूजा नाईकचा नार्को चाचणीस नकार! तपासात तांत्रिक पेच निर्माण होण्याची शक्यता; 'बड्या माशांची' नावे गुपितच राहणार?

नजरचुकीमुळे घडले!

या प्रकरणाची माहिती कारागृह महानिरीक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले. चौकशीत त्या वेळी कार्यरत असलेले सहाय्यक अधीक्षक मुकूंद गावस यांनी चुकीने पूजा नाईक हिला बाहेर जाऊ दिल्याचे निष्पन्न झाले. विचारणा केल्यावर त्यांनी ही चूक मान्य करत नजरचुकीमुळे असे घडल्याचा खुलासा केला. त्यांच्या ‘सॉरी’वरच हे प्रकरण तेव्हाच मिटवण्यात आल्याचेही उघड झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com