Pooja Naik: 'कॅश फॉर जॉब' घोटाळ्यात 9 जणांची टीम सामील; ढवळीकरांचं नाव घेत केला पूजाने केला धक्कादायक खुलासा

Cash For Job Scam: गोव्यात गाजत असलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्याला आता नव्या उघडकीमुळे मोठं वळण मिळालं आहे. मुख्य आरोपी म्हणून समोर आलेल्या पूजा नाईक हिने आता धक्कादायक दावा केला आहे.
Cash For Job Scam
Cash For Job ScamDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात गाजत असलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्याला आता नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून समोर आलेल्या पूजा नाईक हिने धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितलं की या रॅकेटमध्ये एकूण नऊ जणांची टीम कार्यरत होती आणि त्यापैकी काही जणांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. या घोटाळ्याबाबत सत्य बाहेर आणण्यासाठी तिने इतर सहकाऱ्यांनाही पुढे यायला सांगितलं होतं. मात्र, इतर आरोपींनी पुढे येऊन माहिती देण्यास नकार दिला, असा खुलासा तिने केला आहे.

पूजा नाईकने सांगितले की, एमजीपी कार्यालयात काम करत होती आणि आर्थिक व्यवहार, देयके किंवा निधी संबंधित कामे तीच हाताळत होती. तिच्या म्हणण्यानुसार, २०१९ मधील मेगा भरती प्रक्रियेच्या काळात मोठ्या प्रमाणात पैशाची देवाणघेवाण झाली.

या भरतीदरम्यान विविध पदांसाठी उमेदवारांकडून पैसे घेतले जात असल्याची चर्चा तेव्हाही होती, परंतु अधिकृत स्तरावर त्यावर काहीही भाष्य झाले नव्हते.

Cash For Job Scam
Ramayana Park Goa: गोव्यात उभारतोय भव्य 'रामायण पार्क'! भाविकांसाठी ठरणार आकर्षण; पर्तगाळीत स्‍टेट ऑफ द आर्ट प्रकल्‍प

पूजा नाईकने दावा केला आहे की या प्रकरणात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा थेट सहभाग होता. तिच्या आरोपानुसार, मंत्री सुदिन ढवळीकर यांनी तिला आयएएस अधिकारी निखिल देसाई तसेच प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांच्याशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले.

या समन्वयाचा उद्देश भरती प्रक्रिया सुरळीत ठेवणे असल्याचा दावा तिने केला आहे. मात्र पूजाच्या म्हणण्यानुसार, या समन्वयाच्या आडून मोठ्या प्रमाणात पैसे हस्तांतरित करण्यात आले.

Cash For Job Scam
Goa VS Gujarat: गुजरातविरुद्ध गोव्याचा पराभव! मालिकेत दुसरा सामना गमावला; आता लढत झारखंडशी

तिने सांगितले की, निखिल देसाई आणि उत्तम पार्सेकर या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळून सुमारे १७ कोटी रुपये दिले, जे भरती प्रक्रियेत गैरव्यवहार करण्यासाठी वापरले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com