Ponda Parking : बेशिस्‍त पार्किंग फोंड्यासाठी डोकेदुखी; वाहनचालक हैराण

Ponda Parking : हे बगलमार्ग फोंड्यासाठी वरदान ठरले होते. पण आता आता पूर्वीच्या मानाने वाहनांची संख्या वाढल्याने वाहने पार्क कोठे करावीत हा प्रश्‍न उपस्‍थित व्हायला लागलाय.
Ponda Parking
Ponda Parking Dainik Gomantak

Ponda Parking :

फोंड्यात रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होऊन बसले आहे. वाहतुकीवर पडणारा ताण कमी व्हावा म्हणून उपमुख्यमंत्री असताना रवी नाईक यांनी २००१ साली फोंड्यात बगलमार्ग उभारून त्‍यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला होता.

हे बगलमार्ग फोंड्यासाठी वरदान ठरले होते. पण आता आता पूर्वीच्या मानाने वाहनांची संख्या वाढल्याने वाहने पार्क कोठे करावीत हा प्रश्‍न उपस्‍थित व्हायला लागलाय.

फोंडा हे मध्यवर्ती शहर असल्यामुळे येथून गोव्यातील कोणत्याही भागाला कनेक्ट करणे सोपे जाते. हे जाणून लोकांनी आता फोंडा शहरात वास्तव करायला सुरूवात केली आहे. आणि यामुळे रस्त्यावरच्या वाहतुकीचा ताण वाढताना दिसत आहे. बाजारहाट करायला आलेले जिथे मिळेल तिथे वाहने पार्क करत असल्यामुळे बऱ्याचवेळा वाहतूक खंडित होताना दिसते.

काही वेळा वाहतूक पोलिस अशा लोकांना तालांव देतात. पण त्यांची नजर वळली की परत दुसरा एखादा तिथे वाहन पार्क करून आपल्या कामाला जात असतो. खास करून फोंडा बाजारात ही स्थिती प्रामुख्याने दिसते. वास्तविक फोंडा बाजारात नगरपालिकेने पार्किंगसाठी खास व्यवस्था केली असतानाही वाहनचालक त्‍याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. या पार्किंगच्‍या जागेत वीजबत्तीची सोय नसल्यामुळे तिथे वाहने ठेवायला भीती वाटते असे बऱ्याच वाहनचालकांनी सांगितले. त्याचबरोबर पावसात तिथे पाणी साचत असल्यामुळे तिथे जाणे कठीण बनते असेही त्‍यांचे म्हणणे आहे.

‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणांमध्‍ये वाढ

फोंडा बसस्‍थानकाजवळ असलेल्‍या शास्त्री सभागृहाची इमारत मोडून त्या जागी पालिकेने पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. त्‍यामुळे तेथे काही प्रमाणात पार्किंगची समस्या नियंत्रणात येण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत.

इतर शहरांप्रमाणे फोंड्यात पे पार्किंग केले तरी हरकत नाही, पण बेदरकार पार्किंगमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा, असे मत नागरिक व्यक्त करतात. अनकेदा ‘हिट ॲण्ड रन’ची प्रकरणे घडतात. वाहतूक कोंडीमुळे सकाळी व संध्याकाळी विठोबा मंदिरापासून दादा वैद्य चौकापर्यंतचा साधारण एक किलोमीटरचा परिसर पार करायला तब्बल अर्धा तास लागतो. त्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.

वाहतूक पोलिसांची गरज :

आपल्‍या आस्थापनांनजीक वा बाजाराजवळ वाहने पार्क करण्याची बहुतांश वाहनचालकांची मानसिकता असते. त्याचा त्रास वाहतुकीला तसेच पादचाऱ्यांना होतो. खरे तर नगरपालिकेने पार्किंगसाठी केलेली जागा योग्य आहे. तिथे वाहने पार्क करून मासळी मार्केटसह इतर ठिकाणी जाता येते. पण तरीही तेथे वाहने पार्क करायला वाहनचालक काकू करताना. याबाबत वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करणे आवश्‍यक आहे. निदान बाजारात तरी वाहतूक पोलिस कायम तैनात करावा, अशी मागणी होत आहे.

Ponda Parking
Goa's Pankaj Narvekar Climbs Mount Everest: ऐतिहासिक! माऊंट एव्हरेस्ट सर करणारा पंकज ठरला पहिला गोमन्तकीय

बेशिस्‍त वाहतूक ही फोंडा शहराची डोकेदुखी ठरली आहे. त्‍यामुळे बाजारहाट करणे सामान्यांच्या दृष्टीने एक दिव्यच बनले आहे. जोपर्यंत वाहतूक पोलिस सतर्क होत नाहीत, तोपर्यंत ही समस्या आटोक्यात येणे कठीण. फोंडा नगरपालिकेने पार्किंगसाठी असलेल्या जागांचे योग्य व्यवस्थापन करायला हवे.

- राम कुंकळ्‍ळकर, अध्यक्ष (फोंडा विकास समिती)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com