Ponda News : ‘मुक्तिधाम’नंतर आता फोंड्यात उभा राहतोय ‘कोंडवाडा’ : रवी नाईक

Ponda News : मोकाट गुरांची समस्‍या सुटणार; येत्या सहा महिन्यांत अनेक प्रकल्‍प लागणार मार्गी
Ponda
Ponda Dainik Gomantak
Published on
Updated on

Ponda News :

मिलिंद म्हाडगुत

फोंडा, नुकतेच म्‍हणजे १० जूनला नूतनीकरण करून लोकार्पण करण्‍यात आलेल्‍या ‘मुक्तिधाम’ स्मशानभूमीनंतर आता फोंड्यात मोकाट सुटलेल्या गुरांना आळा घालण्यासाठी कोंडवाडा सुरू केला जाणार आहे.

ही मोकाट गुरे फोंड्यासाठीच नव्हे तर राज्‍यासाठी एक जटिल समस्या बनली आहेत. कारण ती वारंवार रस्‍तेअपघातांना कारणीभूत ठरत असून हकनाक कित्‍येकांचे बळी जात आहेत. दुचाकीस्वारांसाठी तर ही गुरे ‘यमदूत’ ठरू लागली आहेत.

Ponda
Goa Congress: 'अजूनही वेळ गेलेली नाही', विधवांवरील अत्याचार थांबवण्यासाठी विधेयक आणा - बीना नाईक

यावर उपाययोजना म्‍हणून कोडार-बेतोडा येथे उभारण्‍यात आलेल्‍या कोंडवाड्याचे उद्‌घाटन येत्या २८ जूनला होणार असल्याचे कृषीमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी सांगितले.

कोडार येथे २७ हजार स्‍क्‍वेअर मीटर जमिनीत या कोंडवाड्याची स्थापना करण्‍यात आली आहे. मोकाट गुरांची रवानगी तेथे करण्‍यात येईल. यासाठी खास वाहनाची व्यवस्था केली जाणार असल्‍याचे नाईक यांनी सांगितले.

फोंडा पालिकेचा ‘गोल्डन प्रोजेक्ट’

फोंडा पोलिस स्‍थानकामागे नगरपालिकेचा ‘गोल्डन प्रोजेक्ट’ नवीन स्वरूपात अस्तित्वात येणार आहे. सध्या फोंडा नगरपालिकेच्या नूतन इमारतीचे काम सुरू असून लवकरच या अद्ययावत इमारतीचे लोकार्पण करण्‍यात येईल, असे रवी नाईक यांनी सांगितले. दरम्‍यान, २८ जूनला सुरू होणाऱ्या कोंडवाडाच्या उद्‍घाटनाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍यासह अनेक मान्‍यवर उपस्‍थित राहणार आहेत.

फोंडा शहर होणार चकाचक

येत्या काही दिवसांत फोंडा शहराचा कायापालट होणार आहे. सध्या शास्‍त्री हॉल असलेली इमारत पाडून तेथे वाहनांसाठी पार्किंग सुविधा उपलब्‍ध करण्‍यात येणार आहे. लवकरच पे पार्किंग करण्‍यात येईल. सध्या फोंडा शहरात पार्किंग समस्या उग्र बनली आहे. इतर शहरांसारखे फोंड्यातही पे पार्किंग करून वाहतुकीत शिस्त आणण्यात येईल. त्याचप्रमाणे फोंड्याच्या सौंदर्यीकरणावर लक्ष देणार आहे. त्यामुळे शहर लवकरच चकाचक दिसेल, अशी ग्‍वाही आमदार रवी नाईक यांनी दिली.

कोडार-बेतोडा येथे २७ हजार स्‍क्‍वेअर मीटर जमिनीत कोंडवाडा बांधण्‍यात आला आहे. मोकाट गुरांची रवानगी तेथे करण्‍यात येईल. यासाठी खास वाहनाची व्यवस्था केली जाणार आहे.

- रवी नाईक, कृषीमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com