Ponda-Sanquelim Municipal Election 2023: सकाळी 10 पर्यंत दोन्ही पालिकांसाठी 'इतके' टक्के मतदान; रवी नाईक म्हणाले...

सकाळी 8 ते 10 या कालावधीतील दोन्ही पालिकांसाठी झालेल्या निवडणुकीची आकडेवारी समोर आली आहे.
Ponda-Sanquelim Municipal Election
Ponda-Sanquelim Municipal ElectionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Ponda-Sanquelim Municipal Election 2023: राज्यात सर्वत्र चर्चेचा विषय बनलेल्या साखळी आणि फोंडा पालिकांसाठी आज शुक्रवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे.

निवडणूक आयोगाने साखळीत 10 तर फोंड्यात एकूण 22 मतदान केंद्रे उभारली असून आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रांचा आज ताबा घेतला. (Ponda-Sanquelim Municipal Election Voter Tounout)

Ponda-Sanquelim Municipal Election
Porvorim Car Accident: पर्वरीत दोन कारमध्ये भीषण अपघात; कारचालकासह दोघेजण जखमी

सकाळी 8 ते 10 या कालावधीतील दोन्ही पालिकांसाठी झालेल्या निवडणुकीची आकडेवारी समोर आली आहे. सकाळी 8 ते 10 या वेळेत साखळी पालिकेसाठी एकूण 22.75 टक्के मतदान पार पडले आहे.

तर सकाळी 8 ते 10 यावेळेत फोंडा पालिकेसाठी एकूण 20. 87 टक्के मतदान पार पडले आहे.

रवी नाईक यांनी जेव्हा मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी आपल्या सर्व वॉर्ड सर्वच उमेदवार यशस्वी विजयी होतील असा आशावाद व्यक्त केला.

शिवाय ते म्हणाले की, विकासाला नवी दिशा देण्यासाठी या उमेदवारांना विजयी करणे आवश्यक आहे.

दरम्यान, शेवटचा एक तास कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांकरता राखीव ठेवण्यात आला आहे. 10 प्रभागांसाठी 6 हजार 932 मतदार असून यापैकी 3 हजार 391 पुरुष तर 3 हजार 541 महिला मतदार आहेत.

फोंडयात कृषिमंत्री रवी नाईक तर काँग्रेसकडून राजेश वेरेकर यांनी प्रचाराची धुरा संभाळली होती. साखळीमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी प्रचार केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shivaji Maharaj Complex Bicholim Lifts
Ravi Naik Birth Anniversary Tribute
Tarun Tejpal Life in Colvale Jail
Ponda Assembly Election
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com