Land Scam : उत्तराखंडमधील व्यावसायिकास दाम्पत्याकडून एक कोटीचा गंडा

शिवोलीतील जोडपे : जमीनविक्रीतून केली फसवणूक
Land Scam
Land Scam Dainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa : जमीन विकण्याचे भासवून व्यावसायिक पुरुषोत्तमकुमार अगरवाल (रा. उत्तराखंड) यांना तब्बल १ कोटी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी शिवोली येथील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेगी फर्नांडिस असे संशयिताचे नाव असून या कृत्‍यात त्‍याला तिच्‍या पत्‍नीचीही साथ असल्‍याचे प्रथमदर्शनी स्‍पष्‍ट झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसर, सदर फसवणुकीचा प्रकार २४ जानेवारी २०१९ ते १० जुलै २०२३ यादरम्यान घडला. संशयित दाम्पत्याने फिर्यादी अगरवाल यांना बार्देश तालुक्यातील दोन ठिकाणाच्या जमिनी दाखविल्या होत्या. तसेच सदर जमिनी आपल्याच असल्याचे भासवून जमिनीचे मालकीहक्क विकण्याचे प्रयत्न केले आणि गेल्या दि. २४ जानेवारी

Land Scam
GO First Airline दिवाळखोरीत! सर्व उड्डाणे रद्द, प्रवाशांनी केली तक्रार, DGCA ने दिली नोटीस

२०१९ रोजी जमीन विक्रीचा करार केला.

या करारानुसार संशयितांनी फिर्यादीकडून १ कोटी रुपयांची रक्कम घेतली. मात्र, त्यानंतर जमिनीचा मालकीहक्क देण्यास संशयितांनी टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्यादीने रक्कम परत करण्याची मागणी केली. त्यानुसार संशयितांनी आपल्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे माहित असतानाही फिर्यादीला धनादेश दिले. मात्र, खात्यात पैसे नसल्यामुळे सदर चेक बाऊन्स झाले.

Land Scam
Goa Rajyasabha Election: सदानंद शेट तानावडे यांनी दाखल केला अर्ज | Sadanand Shet tanavade

गुन्‍हा केला नोंद

संशयितांनी रक्कम परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे अखेर फिर्यादी अगरवाल यांनी काल सोमवारी १० जुलै रोजी म्हापसा पोलिसांत याप्रकरणी लेखी तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४२० व ३४ कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा संशयित दाम्पत्याविरुद्ध दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com