Ponda News : रामनाथी - फोंड्यात उद्यापासून होणार हिंदू अधिवेशन; अनेक विषयांवर होणार चर्चा

Ponda News : गोमंतकीय इतिहास पाठ्यपुस्तकात समावेश व्हावा
Ponda
Ponda Dainik Gomantak
Published on
Updated on

Ponda News :

फोंडा, रामनाथी - फोंडा येथे येत्या २४ ते ३० तारखेपर्यंत यंदाचे बारावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन चालणार असून या अधिवेशनात यावेळी गोव्यातील शालेय अभ्यासक्रमात ‘इन्क्विझिशन’चा इतिहास समावेश करा अशी मागणी करण्यात येणार आहे.

याशिवाय देशाशी संबंधित अन्य विषयही चर्चेला येणार असल्याची माहिती फोंड्यात आज (शनिवारी) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. ही पत्रकार परिषद हिंदू जनजागृती समितीतर्फे घेण्यात आली होती.

यावेळी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ संघटक सुनील घनवट तसेच हिंदू जनजागृती समितीचे दक्षिण गोवा राज्य समन्वयक सत्यविजय नाईक आणि ॲड. शैलेंद्र नाईक आदी उपस्थित होते.

गोव्यातील प्राचीन मंदिरांचा इतिहास, पोर्तुगीज काळात झालेला मंदिरांचा इतिहास आणि इन्क्विझिशन काळातील अत्याचार तसेच इतिहासकालीन विषय आणि गोव्याचा खरा इतिहास विद्यार्थ्यांना शिकवला जावा अशी मागणी या अधिवेशनात करण्यात येणार असून त्यादृष्टीने पुढील दिशा ठरवण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Ponda
Goa Petrol Diesel Price: शनिवारपासून इंधन महागणार, गोव्यातील पंपांवर वाहनधारकांची गर्दी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नालंदा येथे प्राचीन विश्‍व विद्यालयाजवळ एका नवीन प्रकल्पाचे उद्‍घाटन केले आहे. प्राचीन विश्‍व विद्यालयाचे पुनरुत्थान सध्या सुरू आहे, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशात धार्मिक तसेच पौराणिक आणि अध्यात्मिक विषयही मुलांना शिकवले जाणार आहेत, त्याच धर्तीवर गोव्यातही या राज्याचा प्राचीन इतिहास शिकवण्याची आवश्‍यकता निर्माण झाली असल्याचे सांगण्यात आले.

या अधिवेशनात हा विषय प्रकर्षाने चर्चिला जाणार असल्याचे सुनील घनवट म्हणाले. या अधिवेशनात दत्त पद्मनाभ पीठाधीश्‍वर ब्रम्हेशानंद स्वामी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजन भोबे यांना बोलावण्यात आले आहे.

‘अधिवक्ता संमेलना’चेही आयोजन

ॲड. शैलेंद्र नाईक यांनी या अधिवेशनातील शेवटच्या दोन दिवसांत ‘अधिवक्ता संमेलन’ होणार असून त्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले. या अधिवेशन काळात मान्यवरांकडून आपले विचारही व्यक्त करण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com