Ponda Fire Video: फोंड्यात आगीचे थैमान! 2 गाडे जळून खाक; तिसऱ्या गाड्यातील कपाटाला आगीची झळ

Ponda Fire News: वरचा बाजार-फोंडा येथे रविवारी रात्री लागलेल्या आगीत दोन गाडे जळून खाक झाले तर तिसऱ्या गाड्यातील एका कपाटाला आगीची झळ बसली.
Ponda Fire News
Ponda Fire NewsDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : वरचा बाजार-फोंडा येथे रविवारी रात्री लागलेल्या आगीत दोन गाडे जळून खाक झाले तर तिसऱ्या गाड्यातील एका कपाटाला आगीची झळ बसली.

देवीदास नाईक व विश्रांती देवळी या दोघांच्या गाड्यांना आग लागली तर सचिन आर्सेकरयाच्या गाड्यातील कपाटाला आग लागली. थंडपेय तसेच किरकोळ सामान विक्रीचे हे गाडे होते. आगीची ही घटना लक्षात आल्यानंतर लगेच फोंडा अग्निशामक दलाला कळविण्यात आले.

Ponda Fire News
Birch Fire Tragedy: रघुवीर बागकरच्या अडचणीत वाढ; पोलीस कोठडीत 7 दिवसांची वाढ

त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, फोंड्यातील भाजपचे उमेदवार रितेश नाईक, नगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर व काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर यांनी आगीत जळालेल्या गाड्यांची पाहणी केली.

Ponda Fire News
Goa News: वीज खांबांवर केबल्सचे 'बेकायदेशीर' जाळे; दोन कंपन्यांविरुद्ध तक्रार दाखल, वाचा दिवसभरातील घडामोडी

मडकईत मारहाणप्रकरणी आठजणांविरुद्ध गुन्हा

पारंपई-मडकई येथे कुंडई येथील दर्शन नाईक याला मारहाण केल्याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी फोंड्यातील संकेत नाईक व साईदत्त नाईक या दोघांसह अन्य सहाजणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. मारहाणीचा हा प्रकार रविवारी (ता. २९) रात्री साडेआठच्या सुमारास घडला होता. म्हार्दोळ पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com