Ponda Electricity Shortage : फोंडा,सासष्टी भागातील रहिवासी विजेच्या लपंडावाने त्रस्त फोंडा,सासष्टीत दिवसभरात ३ ते ४ वेळा वीज पुरवठा खंडित; अधिकारी म्हणतात, पुढील वर्षी

दिवसातून तीन-चार वेळा वीजपुरवठा खंडित; व्यवसायावर विपरित परिणाम
Ponda Electricity Shortage
Ponda Electricity ShortageDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda Electricity Shortage : सासष्टी तालुक्यातील ग्रामीण तसेच किनारी भागातील रहिवासी विजेच्या लपंडावाने त्रस्त झाले आहेत. येथील परिसरातील वीजपुरवठा अनेकवेळा गुल्ल होण्याचा प्रकार घडत आहे. अशाने येथील रहिवाशांना उष्णतेचे चटके सहन करावे लागत आहेत. याबरोबरच येथील व्यवसायावरही विपरित परिणाम होत असल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले.

कुडतरी, वेळ्ळी, राय, लोटली, बाणावली, कोलवा, सारझोरा व इतर पंचायत क्षेत्रात हा प्रकार सर्रास घडत आहे. कुठलेही घरगुती काम विजेशिवाय करणे शक्यच नसते. एकदा गेलेली वीज तासन्‌तास गायबच असते, त्यामुळे अनेक कामे खोळंबून पडतात, अशी माहिती राय येथील गृहिणी विल्मा फर्नांडिस यांनी दिली.

बाणावलीतील एका निवासी हॉटेल व्यावसायिकाने सांगितले की, वीजपुरवठ्याची येथे मोठ्या प्रमाणात समस्या आहे. कधी येते कधी जाते याला वेळच असत नाही. अशाने व्यवसायावर विपरित परिणाम होत आहे.

Ponda Electricity Shortage
Panaji : पहिल्याच पावसाने मिरामार सर्कल जलमय, स्मार्ट सिटीच्या कामाविषयी प्रश्न उपस्थित

तीन-चार वेळा वीज खंडित

कोलवा पंचायतीचे माजी सरपंच अँथनी फर्नांडिस यांनीही येथे वीज गुल होण्याची समस्या कायम असल्याचे सांगितले. ते म्हणाले, कोलवा परिसरात दिवसातून तीन-चार वेळा वीजपुरवठा खंडित होत असतो. वीज खात्याने या प्रकरणात लक्ष घालून येथील समस्या सोडवायला प्राधान्य द्यायला हवे.

पुढील वर्षी समस्या सुटेल

एका अभियंत्याशी संपर्क साधला असता त्याने दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात असलेल्या वीजवाहिन्या अत्यंत जुन्या झालेल्या आहेत तसेच येथील वीजपुरवठा मडगाव येथील मुख्य वाहिनीवर विसंबून आहे, त्यामुळे हा प्रकार घडत आहे. येथील वीज समस्या सोडविण्यासाठी शेल्डे येथील मुख्य वीजवाहिनीवरून बाणावली येथे थेट वीजपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे आणि हे काम येणाऱ्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Ponda Electricity Shortage
Seafarers Pension Scheme: 'खलाशी पेन्शन' बाबत गोवन सिफेरर्स असोसिएशने केलीय 'ही' मागणी

फोंडा तालुक्याला ग्रासलेय खंडित वीजपुरवठा समस्येने

राज्याला खंडित वीजपुरवठा समस्येने ग्रासले असतानाच फोंडा तालुकाही त्यातून सुटलेला नाही. फोंडा तालुक्यातील फोंडा, शिरोडा, मडकई आणि प्रियोळ अशा चारही मतदारसंघांत अधूनमधून खंडित वीजपुरवठ्याची समस्या उद्भवत असल्याने वीजग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

Ponda Electricity Shortage
Goa Petrol-Diesel Price: सलग पाचव्या दिवशी इंधन दर जैसे थे! जाणून घ्या गोव्यातील पेट्रोल-डीझेलचे आजचे दर

फोंडा तालुक्याला कुर्टी वीज केंद्रातून वीजपुरवठा केला जातो. या ठिकाणी अजून एक नवीन वीज ट्रान्स्फॉर्मर उभारण्याची आवश्‍यकता असून त्यामुळे खंडित वीजपुरवठा समस्या दूर होण्यास मदतच होणार आहे. कुर्टी वीज केंद्रात तसे पाहिले तर सातत्याने सुधारणा करण्यात येते; पण वाढते वीज ग्राहक आणि अपुरा पडणारा पुरवठा यामुळे ही समस्या उद्भवत असल्याची माहिती मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com