Ponda News : धनगर समाजाला एसटीचा दर्जा देऊ नये! ‘उटा’ संघटनेची मागणी

Ponda News : फोंड्यात काल ॲग्री बाजार प्रकल्पातील सभागृहात उटा संघटनेचा कार्यकर्ता मेळावाही घेण्यात आला. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
Ponda
Ponda Dainik Gomantak

Ponda News :

फोंडा, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देऊ नये, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून हा निर्णय गोवा सरकारनेही अंमलात आणावा आणि धनगर समाजाला एसटी दर्जा न देता हा दर्जा गावडा कुणबी आणि वेळीपपुरता मर्यादित ठेवावा अशी मागणी युनायटेड ट्रायबल असोसिएशन ‘उटा‘ या संघटनेने केली आहे.

फोंड्यात काल उटा संघटनेच्या पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी ही मागणी केली असून यावेळी संघटनेचे दुर्गादास गावडे, विश्‍वास गावडे, सतीश वेळीप, नानू बांदोडकर तसेच इतर समिती सदस्य उपस्थित होते.

फोंड्यात काल ॲग्री बाजार प्रकल्पातील सभागृहात उटा संघटनेचा कार्यकर्ता मेळावाही घेण्यात आला. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

प्रकाश वेळीप म्हणाले की, गोव्यात निवडणुकीसाठी राजकीय आरक्षण देण्याची तयारी सरकारने केली आहे. ही मागणी घेऊन उटा संघटना वेळोवेळी मुख्यमंत्री तसेच इतर संबंधित मंत्र्यांना भेटली होती.

त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्यावर त्यांनी गोव्याला विधानसभा निवडणुकीत १२ टक्के आरक्षण देण्याची ग्वाही दिली आहे, आणि हा निर्णय लवकरच लागू करण्यात येणार आहे.

Ponda
Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

गोवा विधानसभेतही अशा आशयाचा ठरावही संमत झाला आहे. त्यामुळे पुढील काळात हे राजकीय आरक्षण अनुसूचित जमातीला मिळेल, असा विश्‍वास प्रकाश वेळीप यांनी व्यक्त केला.

पर्वरी येथील ट्रायबल भवनचे काम काही कारणामुळे अडून राहिले आहे. या ट्रायबल भवनात अनुसूचित जमातीच्या लोकांना आवश्‍यक सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच इतर काही उपक्रमही आखता येणार आहेत. मात्र हे काम बंद पडल्याने ते लवकरात लवकर सुरू करावे अशीही मागणी उटा संघटनेतर्फे करण्यात आली.

Ponda
Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

१२ टक्के आरक्षण त्वरित लागू करा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्यावर त्यांनी गोव्याला विधानसभा निवडणुकीत १२ टक्के आरक्षण देण्याची ग्वाही दिली आहे. हा निर्णय लवकर लागू करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com