Ponda By Election: फोंडा मतदारसंघात प्रचाराला चढतोय रंग! काँग्रेसकडून कोपरा बैठकांवर भर; मंत्री-आमदारांचे ‘चलो फोंडा’ अभियान

Ponda by election 2026: सध्या या लढतीला ‘करो या मरो’चे स्वरूप प्राप्त होताना दिसायला लागले आहे. आणि यामुळेच अनेक मंत्री-आमदारांनी ‘चलो फोंडा’चे अभियान सुरू केल्याचे बघायला मिळत आहे.
Ponda by election
Ponda by electionDainik Gomatnak
Published on
Updated on

फोंडा: फोंडा पोटनिवडणुकीला आता चांगलीच लज्जत प्राप्त होऊ लागली आहे. या निवडणुकीत निवडून येणाऱ्या आमदाराचा कार्यकाल जरी फक्त सहा-सात महिन्यांचा असला तरी भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ही पोटनिवडणूक म्हणजे प्रतिष्ठेची बाब केल्याचे दिसत आहे. यामुळे सध्या या लढतीला ‘करो या मरो’चे स्वरूप प्राप्त होताना दिसायला लागले आहे. आणि यामुळेच अनेक मंत्री-आमदारांनी ‘चलो फोंडा’चे अभियान सुरू केल्याचे बघायला मिळत आहे.

नुकताच वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी भाजप कार्यकर्त्यांसह खडपाबांध भागात भाजपचे उमेदवार रितेश नाईक यांचा प्रचार केला. पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर हे तर फोंड्यात डेरा टाकून बसलेले आहेत. माजी खासदार नरेंद्र सावईकर, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हेही मतदारसंघात फेरफटका मारून परिस्थितीचा आढावा घेत आहे.

त्याचप्रमाणे ‘मगो’चे नेते वीजमंत्री सुदिन ढवळीकर व अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनीही ‘मगो’ कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना भाजपचा प्रचार करण्यास सांगितले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ‘मगो’चे फोंड्यातील अनेक कार्यकर्ते सध्या काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांच्याबरोबर फिरत असल्याचे निदर्शनास आल्यामुळेच ढवळीकरांनी ही बैठक घेतल्याची माहिती मिळाली आहे.

काँग्रेसने कोपरा बैठका घ्यायला सुरवात केली असून काल त्यांच्या खांडेपारमधील विविध भागांत प्रचार बैठका झाल्या. विशेष म्हणजे या बैठकांना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा हेही उपस्थित होते. पुढील आठवडाभर या बैठका सुरू राहतील, असे काँग्रेसचे प्रचार प्रमुख जॉन परेरा यांनी सांगितले.

‘आप’नेही प्रचार सुरू केला असून त्यांच्या जाहीर सभेला दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत सध्या या पोटनिवडणुकीमुळे फोंड्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून त्यावरून भाजप व काँग्रेसमध्ये ‘कांटे की टक्कर’ होण्याचे संकेत मिळायला लागले आहेत, एवढे निश्चित.

Ponda by election
Goa Politics: खरी कुजबुज; ...तर सुदिन, ‘मगो’बाबत वेगळा निर्णय

रवींचा उदो-उदो?

या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस व भाजप दोन्हीही पक्ष दिवंगत मंत्री रवी नाईक यांचा उदो-उदो करताना दिसत आहेत. रवी हे बराच काळ काँग्रेसमध्ये असल्यामुळे जो काही फोंड्याचा विकास झाला आहे, तो रवींच्या काँग्रेस कारकिर्दीत झाला, असे काँग्रेस कार्यकर्ते सांगत आहेत तर बहुजन समाजाचे मोठे नेते रवी यांच्या पुत्राला उमेदवारी देऊन आम्ही बांधीलकी जोपासली आहे, असे भाजप नेते सांगत आहेत.

Ponda by election
Goa Politics: खरी कुजबुज; ...म्‍हणून भाजपकडून रितेशसह दळवींचे नाव

मुख्यमंत्रीही उतरणार रिंगणात?

भाजपची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या विश्वनाथ दळवी व उमेदवार रितेश नाईक यांची दिलजमाई केल्यानंतर आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सक्रिय प्रचाराच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पुढील आठ दिवस ते फोंड्यात येणार असून मतदारसंघातील काही प्रमुख नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. यातून मुख्यमंत्र्यांनी ही पोटनिवडणूक किती गांभीर्याने घेतली आहे, हे सूचित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com