Ponda By Election: फोंडा पोटनिवडणूक रद्द, उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! निवडणूक अधिसूचना ठरवली रद्दबातल

Ponda By Election Cancelled: गोव्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी एक बातमी समोर आली. फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
Ponda By Election Cancelled
High CourtDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी एक बातमी समोर आली. फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून नियोजित पोटनिवडणूक रद्द करण्याचे आदेश दिले. प्रितम हरमलकर आणि अंकिता कामत यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने मान्य केली असून या निवडणुकीसाठी जारी करण्यात आलेली अधिकृत अधिसूचना रद्दबातल ठरवली. या निकालामुळे उद्या, म्हणजेच 9 एप्रिल रोजी होणारी मतदानाची प्रक्रिया आता पूर्णपणे थांबवण्यात आली.

या प्रकरणातील मुख्य कायदेशीर पेच निवडून येणाऱ्या प्रतिनिधीचा कार्यकाळ होता. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, पोटनिवडणूकीत निवडून येणाऱ्या आमदाराला किमान एक वर्षाचा कार्यकाळ मिळणे आवश्यक असते. मात्र, फोंडा येथील रिक्त जागेसाठी होणाऱ्या या निवडणुकीत निवडून येणाऱ्या आमदाराला हा एक वर्षाचा कालावधी मिळणार नसल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत निवडणूक आयोगाची अधिसूचना कायद्याला धरुन नसल्याचे स्पष्ट केले.

Ponda By Election Cancelled
Ponda By Election 2026: रणधुमाळीत जाहीर प्रचाराची सांगता, हायकोर्टाच्या निकालावर फोंडा पोटनिवडणुकीचं भवितव्‍य; भाजपसह काँग्रेस, आपची ताकद पणाला

न्यायालयाने केवळ निवडणूक रद्दच केली नाही, तर या आदेशाला स्थगिती देण्याची निवडणूक आयोगाची विनंतीही फेटाळून लावली. यामुळे प्रशासनासमोर आता ही निवडणूक प्रक्रिया तातडीने थांबवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही.

Ponda By Election Cancelled
Ponda By-Election: फोंड्यात आता भाजपविरुद्ध भाटीकर? भाजपची संपूर्ण प्रचार यंत्रणा रिंगणात; काँग्रेसचे सावध डावपेच

माजी मंत्री तथा फोंड्याचे माजी आमदार स्व. रवी नाईक यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या निवडणुकीच्या मैदानात भाजपने रवी नाईक यांचे ज्येष्ठ सुपुत्र रितेश नाईक, काँग्रेसने डॉ. केतन भाटीकर, तर आपने गीतेश नाईक यांना उतरवले होते. मात्र, आता निवडणूक प्रक्रियाच बाद ठरल्याने सर्व उमेदवारांचे भवितव्य अधांतरी झाले. निवडणूक आयोगाने या निकालावर अद्याप आपली पुढील भूमिका स्पष्ट केलेली नाही. तुर्तास, उद्या फोंडा येथे मतदान होणार नाही, हे निश्चित झाले असून उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे 'एक वर्षाच्या कार्यकाळाचा' कायदेशीर मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. प्रशासनाने आता सर्व मतदान केंद्रांवरील यंत्रणा मागे घेण्याच्या सूचना दिल्या असून मतदारांमध्ये या निर्णयामुळे संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com