Ponda By Election: फोंडा पोटनिवडणुकीसाठी भरपगारी सुटी जाहीर; रोजंदारी, कंत्राटी कामगारांसाठीही सुटी अनिवार्य

Ponda Election: भारतीय निवडणूक आयोगाने ९ एप्रिल रोजी फोंडा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी त्या मतदारसंघातील मतदारांसाठी भरपगारी सुटी जाहीर केली आहे.
Ponda By Election
Ponda By ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भारतीय निवडणूक आयोगाने ९ एप्रिल रोजी फोंडा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी त्या मतदारसंघातील मतदारांसाठी भरपगारी सुटी जाहीर केली आहे.

''लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१'' च्या कलम १३५ ब नुसार, कोणत्याही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर कोणत्याही आस्थापनेत कार्यरत असलेल्या राज्यांच्या ''विधानसभा'' पोटनिवडणुकीत मतदान करण्यास पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी देण्यात येईल, असे जाहीर केले आहे.

Ponda By Election
Goa Mankurad Mango: मानकुराद दीड हजार रुपये डझन, बाजारात आवक वाढली; स्थानिक आंब्यांना अधिक मागणी

या दिवशी वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही. या तरतुदींचे उल्लंघन करणारा कोणताही व्यक्ती दंडास पात्र ठरेल. आयोगाने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत की, या तरतुदींचे काटेकोर पालन करण्यासाठी संबंधित सर्वांना आवश्यक ते निर्देश द्यावेत आणि सर्व मतदार आपला मतदानाचा हक्क मुक्तपणे व सोयीस्करपणे बजावू शकतील, याची खात्री करावी.

Ponda By Election
Goa Unseasonal Rain: वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण! शनिवारी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

रोजंदारी, कंत्राटी कामगारांसाठीही सुटी अनिवार्य

सर्व रोजंदारी आणि कंत्राटी कामगार देखील मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी मिळण्यास पात्र असल्याचे आयोगाने सांगितले आहे. आयोगाने पुढे असेही स्पष्ट केले आहे की, जे मतदार (यात कंत्राटी आणि रोजंदारी कामगारांचा समावेश आहे) आपल्या स्वतःच्या मतदारसंघाबाहेर स्थित औद्योगिक किंवा व्यावसायिक आस्थापनांमध्ये कार्यरत आहेत, परंतु ज्यांची मतदार म्हणून नोंदणी त्या मतदारसंघात झाली आहे जिथे मतदान होणार आहे; त्यांनाही मतदानाच्या दिवशी आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुटीचा लाभ मिळण्याचा अधिकार असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com