दिवार बेटावरील तलाव आणि स्मशानभूमी कर्नाटक-गोवा यांच्यातील दुवा

पूर्वी तलावाला लागून असलेले मंदिर आता अस्तित्वात नाही. गोव्यातील एके काळी भरभराट झालेल्या कदंब युगाचा हा पुरातत्वीय पुरावा आहे जो आपल्याला त्या काळात घेवून जातो.
pond and cemetery in Goas Diwar island show old link between Karnataka and Goa

pond and cemetery in Goas Diwar island show old link between Karnataka and Goa

File image

Published on
Updated on

गोव्याच्या (Goa) दिवार बेटावर एक तलाव आणि स्मशानभूमी कर्नाटक (Karnatak) आणि गोवा यांच्यातील जुने संबध दर्शविते. कोटी तीर्थ ताली हा एक तलाव आहे ज्यामध्ये 108 कोरीव पोकळ्या आहेत, ज्यामध्ये लहान गोपुरम सारखी रचना आहे. आणि आयताकृती तलाव लॅटराइट-दगडाच्या पायऱ्यांनी वलयांकित आहे.

नोव्हेंबरमध्ये या ठिकाणी भेट द्यायला अनेक पर्यटक (Tourist) येतात तेव्हा या आकाराचा तलाव पाण्याने भरलेला असल्याने सुंदर दिसतो आणि प्रत्येकाला आकर्षित करतो. इतिहासकार म्हणतात की, कदंब (Kadamba) राजांचे कुलदैवत असलेल्या सप्तकोटीश्वर कल्याणी मंदिराचा (मंदिर तलाव) हा भाग आहे, ज्यांनी 10 व्या आणि 14 व्या शतकादरम्यान या क्षेत्रावर राज्य केले होते.

<div class="paragraphs"><p>pond and cemetery in Goas Diwar island show old link between Karnataka and Goa</p></div>
गोव्यातील ख्रिसमस सेलिब्रेशन 2021...

पूर्वी तलावाला लागून असलेले मंदिर आता अस्तित्वात नाही. गोव्यातील एके काळी भरभराट झालेल्या कदंब युगाचा हा पुरातत्वीय पुरावा आहे जो आपल्याला त्या काळात घेवून जातो. इतिहासाची आठवण करून देतो. गोव्यातील इतिहासकार रोहित फळगावकर म्हणतात की, दिवार बेटावर दोन प्रमुख मंदिरे होती - सप्तकोटीश्वर मंदिर आणि गणपती मंदिर. अल्लाउद्दीन हसन गंगूच्या बहामनी राजवटीत सप्तकोटीश्वर मंदिर नष्ट झाले. 1391 मध्ये विजयनगर राज्यातील मंत्री माधव यांनी याची पुनर्बांधणी केली. विजयनगरच्या ताम्रपटात याची नोंद आहे, असे फलगावकर सांगतात. 1540 मध्ये, पोर्तुगीजांनी संपूर्ण संरचना पुन्हा नष्ट केली. 1558 मध्ये, देवीची मूर्ती नदी ओलांडून डिचोली येथे हलविण्यात आली, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी 1668 मध्ये दुसरे सप्तकोटीश्वर मंदिर स्थापित केले होते. तलाव पाण्याचा स्त्रोत असल्याने तसाच राहिला. कालांतराने त्यातील काही भाग वाहून गेला. 2015 पासून, स्थानिक लोक सरस्वती विसर्जन करण्यासाठी एकत्र जमून या ठिकाणी 108 दिवे लावतात. ही वास्तू आता गोवा सरकारने संरक्षित केलेली आहे. हा तलाव जिथे गणपतीचे मंदिर अस्तित्वात होते. आता चर्च ऑफ अवर लेडी ऑफ पीटी जवळ आहे ज्याला आता साओ मथियास टेकडी म्हणतात.

<div class="paragraphs"><p>pond and cemetery in Goas Diwar island show old link between Karnataka and Goa</p></div>
Christmas: गोव्यातील ख्रिसमस

मंदिर आणि चर्च

“या चर्चजवळ (Church) जुन्या मंदिराचे (Temple) अवशेष सापडले, ज्याचे इतिहासकारांनी दस्तऐवजीकरण केले आहे, या चर्चजवळील स्मशानभूमीच्या आतील नक्षीकाम, दगडी ट्रेसरी आणि चॅपलची छत देखील 14 व्या शतकातील कदंब राजवंशातील आहे,” असे फाळगावकर सांगतात. स्थलांतरनानंतर या गणपती मंदिरातील मूर्ती फोंडा (Ponda) तालुक्यातील खांडेपार आणि नंतर जवळच्या खांडोळा गावात हलवण्यात आली. खांडोळ्यातील मंदिरात दिवारची जुनी मूर्ती तसेच नवीन मूर्ती आताही आहे. स्थानिकांनी आता साओ मथियास मंदिराजवळ नवीन शक्ती गणपती मंदिर बांधले आहे. मूळचे नाव दिवड्डी, म्हणजे वस्तीचे बेट, दिवार बेटावर धार्मिक महत्त्व असलेले अनेक ऐतिहासिक अवशेष आणि पुरातन चर्च आहेत, जी आता कोविड-19 मुळे बंद करण्यात आली आहेत. हे बेट पिदाडे, मलार आणि नरोआ (Piedade, Malar and Naroa) या तीन गावांमध्ये विभागले गेले आहे. नरोआमध्ये कोटीतीर्थ ताली आणि साओ मथियास चर्च आहे. हे बेट पणजीपासून (Panaji) सुमारे 10 किमी वरच्या दिशेने आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com