Par River: बार्देश तालुक्याची जीवनदायिनी प्रदूषणाच्या विळख्यात! पंचायतीच्या दंडात्मक कारवाईकडे सपशेल दुर्लक्ष

Par River Pollution Goa: डिचोलीतील काही गावांसह संपूर्ण बार्देश तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या अस्नोड्याच्या ‘पार’ नदीत प्लास्टिकसह दुर्गंधीयुक्त कचरा टाकण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे ही नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली असून, नदीचे अस्तित्व संकटात आले आहे.
Par River Pollution Goa
Par RiverDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: डिचोलीतील काही गावांसह संपूर्ण बार्देश तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या अस्नोड्याच्या ‘पार’ नदीत प्लास्टिकसह दुर्गंधीयुक्त कचरा टाकण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे ही नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली असून, नदीचे अस्तित्व संकटात आले आहे.

या संकटाची दखल घेऊन पंचायत तसेच अन्य यंत्रणांनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जागृत नागरिकांकडून होत आहे. डिचोलीतील मुळगाव आणि शिरगावहून पुढे बार्देश तालुक्याला जोडलेली ‘पार’ नदी डिचोलीसह बार्देश तालुक्यासाठी वरदान ठरत आहे. मात्र, याच नदीवर सध्या मानवनिर्मित प्रदूषणाचा (Pollution) आघात होत आहे.

Par River Pollution Goa
Sewage Water In Par River: धक्कादायक! पार नदीत सोडले मैलामिश्रीत पाणी; पिण्यासाठीही पुरवल्याचे स्पष्ट

कचऱ्यासह या नदीत सांडपाणी मिसळत असतानाच विविध ठिकाणी कपडे आणि गुरांना धुण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या नदीत काही ठिकाणी अस्वच्छता निर्माण होत आहे. ही नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत, तर काही वर्षांनंतर नदीचे अस्तित्व पूर्ण धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. साधारण १५ वर्षांपूर्वी किरकोळ अपवाद वगळता ही नदी स्वच्छ होती. मात्र, दिवसेंदिवस या नदीत अस्वच्छतेचे प्रमाण वाढत आहे.

कारवाईचे काय झाले?

‘पार’ नदी अधूनमधून स्वच्छ करण्यात येते. तरीदेखील नदीत प्रदूषण वाढत आहे. या नदीत कचरा टाकण्याचे प्रकार नियंत्रणात आणण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविले आहेत. नदीत कचरा टाकताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे पंचायतीने पूर्वी स्पष्ट केले होते. तरीदेखील अजूनही या नदीची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका झालेली नाही. उलट कचरा टाकण्याचे प्रकार वाढत आहेत, त्यामुळे पंचायतीच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Par River Pollution Goa
Valvanti River: वाळवंटी नदीचा ‘उभो गुणो’ डोह वाचवा! स्थानिकांचे निवेदन; पर्यटन, सहलींवर बंदी घालायची मागणी

बॉयलर कोंबड्यांचे अवशेष

‘पार’ नदीत प्लास्टिकसह निर्माल्य टाकण्याचे प्रकार सुरूच असतात. त्याशिवाय काहीजण घरातील किंवा हॉटेलमधील कचरा आणि टाकाऊ पदार्थ नदीत टाकत असल्याची माहिती मिळाली आहे. चिंतेची बाब म्हणजे बाजारातील काही चिकन विक्रेते बॉयलर कोंबड्यांचे अवशेष आणि विष्ठाही नदीत टाकतात.

मासे विक्रेते टाकाऊ खराब मासळीही नदीत टाकतात. सध्या पाणी अडवल्यामुळे हा प्रकार लक्षात येत नसला, तरी नदीपात्राच्या तळाशी हा कचरा साचल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अस्नोडा पुलाजवळ नदीचा परिसर गलिच्छ आणि दुर्गंधीयुक्त बनला आहे. बंधाऱ्याला तर प्लास्टिक (Plastic) बाटल्या आदी कचरा अडकला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com