E-Coli In River: गोव्यातील नद्यांतील पाण्यामध्ये ‘ई-कोलाय’ अमर्याद; ‘प्रदूषण नियंत्रण’चा हरित लवादाला अहवाल

थेट किडनीवर होतो परिणाम
River.
River.Dainik Gomantak
Published on
Updated on

E Coli limitless In River Water In Goa: राज्यातील बहुतांश नद्यांचे पाणी प्रदूषित झाले आहे. या नद्यांमधील पाण्यात ई-कोलाय बॅक्टेरियांचे प्रमाण कमालीचे आढळले आहे.

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील नद्यांच्या पाण्याचे नमुने घेऊन केलेल्या तपासणीत ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

१०० मिलीलीटर पाण्यामध्ये १०० बॅक्टेरिया असणे, ही सर्वसामान्य बाब मानली गेली आहे. मात्र, राज्यातील नद्यांमधील पाण्यात प्रत्येक १०० मिलीलीटरमध्ये हजारो बॅक्टेरिया सापडले आहेत.

राष्ट्रीय हरित लवादाने एका याचिकेवर सुनावणी करताना दर महिन्याला नद्यांच्या पाण्याचे नमुने तपासून त्याविषयीचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.

त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळ दर महिन्याला ठराविक ठिकाणी नद्यांच्या पाण्याचे नमुने घेते आणि त्याचा अहवाल लवादासमोर सादर करते. हा अहवाल सादर करण्याची जबाबदारी एकत्रितपणे पर्यावरण खात्याकडे सोपवण्यात आली आहे.

या खात्याने ऑगस्टमध्ये घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल लवादासमोर सादर केला आहे. त्यात राज्यातील प्रमुख नद्यांच्या पाण्यात ई-कोलाय बॅक्टेरियांचे प्रमाण मर्यादेबाहेर आढळल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

River.
Pernem Zoning Plan: जमीन रूपांतर आराखडा रद्द होणार नाही; नगरनियोजन मंत्री ठाम

नदी नमुने घेतलेले ठिकाण ई-कोलाय

शापोरा शिवोली पूल १३००

तेरेखोल केरी ७९००

सिकेरी कांदोळी १३००

सिकेरी गणपती मंदिर २२००

झुआरी मडकई धक्का ३५००

झुआरी बोरी पूल ४९०

डिचोली बाराजण ८४००

मांडवी टोंक माशेल ४९०

साळ खारेबांध ४९००

साळ मोबोर ३५००

थेट किडनीवर होतो परिणाम

ई-कोलायमुळे ओटीपोटात दुखणे किंवा अतिसार यांसारखी लक्षणे या बॅक्टेरियामुळे दिसतात. अनेकदा या बॅक्टेरियाच्या प्रादुर्भावामुळे किडनीचे कार्य बंद पडू शकते. परिणामी रुग्णाचा मृत्यू होतो, अशी माहिती काही संकेतस्थळांवर दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com