Water Problem
Water ProblemDainik Gomantak

Water Problem: साकोर्ड्यात पाणीप्रश्‍न पेटला!

Water Problem In Goa: ‘रगाडा’ प्रदूषितच : पंचायतीचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप
Published on

Goa Water Problem:

रगाडा नदी साकोर्डावासीयांसाठी जीवनदायिनी आहे. या रगाडा नदीत मत्स्यपालन प्रकल्पातील सांडपाणी सोडल्यानंतर नदीचे पाणी प्रदूषित झाले, असे पाणी पिण्यासाठी योग्य नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पंचायत मंडळाने प्रदूषित झालेल्या पाण्याचा प्रश्‍न गांभीर्याने घेतला नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला.

बैठकीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. यावेळी कुळे पोलिस निरीक्षक सगुण सावंत यांनी हस्तक्षेप केल्यावर वातावरण शांत झाले. कायद्याचे पालन करून योग्य तोडगा काढावा, अशी सूचना त्यांनी ग्रामस्थांना केली.

उपसरपंच शिरीष देसाई यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, रगाडा नदीच्या प्रदूषित झालेल्या पाण्यासंदर्भात पंचायत मंडळाने कधीच हलगर्जीपणा केला नाही. त्याबाबत सरकारी कार्यालयात पत्रव्यवहार केलेला आहे. २२ रोजी ‘पीएचई''ने पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवले होते. त्या पाण्याचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे, त्यामुळे ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे.

Water Problem
Space Mission: अंतराळात 2035 पर्यंत भारतीय अंतरिक्ष स्टेशन

पंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने प्रदूषित झालेल्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करू शकत नाही, असे स्पष्टीकरण उपसरपंच शिरीष देसाई यांनी बैठकीत सांगितले. निदान पिण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी तरी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी पंचायत मंडळाकडे लावून धरली होती.

फोंडा उपअधीक्षक अर्जी आदील, कुळे पोलिस निरीक्षक सगुण सावंत व सहकाऱ्यांनी मत्स्यपालन प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. सरपंच प्रिया खांडेपारकर, उपसरपंच शिरीष देसाई, पंच संजना नार्वेकर, महादेव शेटकर, जितेंद्र कालेकर, गायत्री मापारी, सोनू गावकर व सचिव सुषमा कवळेकर बैठकीला उपस्थित होत्या.

रविवारी सभा

या बैठकीत ग्रामस्थांनी पंचायतीला निवेदन दिले असून येत्या रविवारी (ता.३) खास ग्रामसभा घ्यावी, अशी मागणी केली आहे. जोपर्यंत जाहीर सभेची नोटीस काढत नाहीत, तोपर्यंत ग्रामस्थ हटणार नाहीत, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्यावर पंचायत सचिव सुषमा कवळेकर यांनी खास जाहीर सभेची नोटीस काढण्यासाठी मंडळाने सूचना केली. त्याप्रमाणे संध्याकाळी जाहीर सभेची नोटीस काढण्यात आली आहे.

प्रवाहातून सांडपाणी पंप हाऊसपर्यंत पोचते व ते पाणी नळातून घरापर्यंत जाते. खास ग्रामसभा घेण्यासाठी पंचायतीला निवेदन सादर केले आहे. त्यासाठी एका आठवड्याची पंचायतीला मुदत दिलेली आहे. माहिती हक्क कायद्या अंतर्गत मत्स्यपालन प्रकल्प ना हरकत दाखला जोडलेल्या दस्तऐवजांच्या प्रतीची मागणी करण्यात आली आहे. नैसर्गिक स्रोत प्रदूषित करण्यात येत आहे, हे आमचे दुर्दैव आहे. पाण्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, यात संशय आहे.

- विपिन नाईक, ग्रामस्थ साकोर्डा.

साकोर्डात रगाडा नदी प्रदूषित झालेली आहे. ही गंभीर बाब आहे. आज घेतलेल्या पाक्षिक बैठकीत गेल्या पंचायत मंडळाने मत्स्यपालन प्रकल्पासाठी दिलेला ‘ना हरकत’ दाखला येत्या तीन दिवसात मागे घेण्यात येणार आहे. पंचायत मंडळाला अंधारात ठेवून पाण्याचे नमुने घेतले होते. त्या पाण्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे, असे वाटते, असे असताना खास ग्रामसभा घेण्यासाठी हट्ट धरला आहे.

-प्रिया खांडेपारकर, सरपंच - साकोर्डा पंचायत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com