Goa Politics: चिदंबरम चक्रव्युहात

25 किंवा 26 रोजी पी. चिदंबरम गोव्यात येणार
Goa Politics: P Chidambaram
Goa Politics: P ChidambaramDainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि गोव्यातील निवडणूक (Goa Election) प्रचारप्रमुख पी. चिदंबरम (P Chidambaram) येत्या 25-26 तारखेला गोव्यात (Goa) येणार असल्याचे जाहीर झाले आहे. या काळात गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) काय मोहीम आखतील, याचा सुगावा त्यांच्या विरोधकांना लागला असल्याचे वृत्त आहे.

ते रात्रीचा दिवस करून ‘गोव्यात युती नको’ असा नारा देऊ लागतील, असे त्यांचे विरोधक मानतात. चिदंबरम हे हार्वर्डमधून शिकून आलेले देशातील एक ज्येष्ठ राजकीय धुरीण. त्यामुळे गोंधळ गजबजाटातही परिस्थिती नेमकी काय आहे आणि वारे कोणत्या बाजूला वाहते हे त्यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटू शकणार नाही. गार्डन एंजल्समध्ये शिकविणारा शिक्षक तर कोणत्याही परिस्थितीत त्यांना चकवा देऊ शकणार नाही. त्यामुळे चिदंबरम गोव्यात नेमके करणार काय, याची उत्सुकता आता एकूणच राजकीय निरीक्षकांना लागली तर नवल नाही.

Goa Politics: P Chidambaram
Goa Politics: पुन्हा खाणींचे सरकारी आमिष

कॉंग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक 25 किंवा 26 ऑगस्ट रोजी गोव्यात येऊ शकतात. ते पुढील आठवड्यात गोवा दौऱ्यावर येणार असल्याचे वृत्त ‘गोमन्तक’ने आज दिले होते. चिदंबरम यांच्या पहिल्या टप्प्यात ते संघटनेच्या विविध पातळ्यांवरील बैठका घेणार आहेत. ते या दौऱ्यात अन्य कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार नसल्याची माहिती आहे. कॉंग्रेसचे धोरण ठरवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आल्याने त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Goa Politics: P Chidambaram
Goa Education: तांत्रिक शिक्षण होणार स्वस्त

दरम्यान भाजपच्या आक्रमकतेपुढे टिकून राहण्यासाठी कॉंग्रेसने आता वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांचा धावा करणे सुरू केले आहे. चिदंबरम पुढील आठवड्यात निवडणूक रणनीती निश्चित करण्यासाठी गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. कॉंग्रेसने सध्या उमेदवारीसाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. त्याआधारे 80 टक्के उमेदवारी नव्या चेहऱ्यांना देण्याचे ठरवले आहे. वेळ्ळी येथे माजी आमदार बेंजामिन सिल्वा यांच्या कॉंग्रेस प्रवेशाला विरोध झाला. ते पाहता कॉंग्रेसमध्ये आता प्रवेश‌ करण्यासाठी अनेकजण इच्छुक असल्याचे दिसते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com