Goa Politics: वीरेश यांची पुन्हा चर्चेकडे पाठ! गोव्याबाहेर असल्याचे दिले कारण, कार्यकर्त्यांत संभ्रम

RGP MLA Viresh Borkar skipping CEC Meeting: अध्यक्ष मनोज परब यांनी आमदार वीरेश बोरकर यांना सोमवारी चर्चेसाठी बोलावले होते.
RGP MLA Viresh Borkar skipping CEC Meeting
RGP MLA Viresh Borkar skipping CEC MeetingDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजी) अध्यक्ष मनोज परब यांनी आमदार वीरेश बोरकर यांना सोमवारी चर्चेसाठी बोलावले होते. पण, गोव्याबाहेर असल्याचे कारण देत त्यांनी बैठकीला उपस्थित राहणे टाळले. बोरकर गोव्याबाहेर गेल्याने त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे? असा प्रश्न पक्षाच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना पडला आहे. 'पूर्वनियोजित काही कार्यक्रम असल्याने 'आरजी'च्या केंद्रीय कार्यकारी समितीने सोमवारी आयोजित

राजकारणात सत्तेसाठी नव्हे, राज्याच्या हितासाठी आलो!

  • फेसबुक पोस्टद्वारे, 'राजकारणात मी सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर गोव्याच्या हितासाठी प्रवेश केला. अण्णा हजारे आंदोलनाच्या काळापासून मला लोकांसाठी लढण्याची प्रेरणा मिळाली.

  • नगरनियोजन खात्याच्या कलम '३९-अ'ला विरोध करीत, गोव्याची ओळख, संस्कृती, गावे, नद्या आणि शेती यांचे संरक्षण करण्यासाठी आपला संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून गोव्याच्या भविष्यासाठी आहे', असे बोरकर यांनी म्हटले आहे.

  • 'गोमंतकीयांनी वैयक्तिक द्वेष बाजूला ठेवून गोव्याच्या हिताचा विचार करावा. उद्या इतिहास विचारेल, गोव्याला तुमची गरज असताना तुम्ही कुठे होतात?' असा सवालही बोरकर यांनी उपस्थित केला आहे.

RGP MLA Viresh Borkar skipping CEC Meeting
Goa Politics: तुम्हीच वेळ ठरवून बैठकीला हजर रहा! परब यांचे नमते, वीरेशना संयत आवाहन

केलेल्या बैठकीला आपणास उपस्थित राहता येणार नाही. पक्षाने सोमवारी दु. ३ ते सायं. ६ वा. या वेळेत उपस्थित राहण्याचे कळविले होते. परंतु, गोव्याबाहेरील काही महत्त्वाच्या चर्चांसाठी आधीच वेळ निश्चित करण्यात आली होती', असे आमदार बोरकर यांनी पक्षाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.'सध्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर परस्पर सहमतीनेयोग्य वेळ ठरवून | बैठक घेणेअधिक सोयीचे ठरेल.

उशीर म्हणजे दुरावा नाही. पक्षापासून दूर जाण्याचा आपला कोणताही हेतू नाही. पक्षाबाबत आपला आदर आणि बांधिलकी कायम आहे. योग्य समन्वयाबाबत आपल्या कार्यालयाकडून पक्षाला माहिती दिली जाईल. गोव्याबाबत बोलताना जर शत्रू निर्माण होत असतील, तर ते मी नम्रतेने स्वीकारतो. राजकीय वेळ आणि घड्याळाची वेळ वेगळी असते', असेही वीरेश यांनी पत्रात नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com