राजकारण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा

सुभाष शिरोडकर: थळ येथे शिवजयंती सोहळा उत्साहात
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharajdainik gomantak
Published on
Updated on

शिरोडा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून आजच्या युवक आणि विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन धैर्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. शिवाजी महाराजांचा आदर्श आजच्या राजकारण्यांनीही घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास देशात रामराज्य अवतरायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन आमदार सुभाष शिरोडकर यांनी केले. थळ शिरोडा येथील कामाक्षी कला विजयते या संस्थेतर्फे थळ येथे तिथीनुसार आज सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली.

Chhatrapati Shivaji Maharaj
म्हापशात ‘स्वराज्य गोमंतक’ तर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यात्रा’

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शिरोडकर बोलत होते. याप्रसंगी सरपंच अमित शिरोडकर, जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुमती नाईक, पंचसदस्य पल्लवी शिरोडकर, शिवानंद नाईक, मेघनाथ शिरोडकर, शिरोडा भाजप मंडळ अध्यक्ष सूरज नाईक, सुवास नाईक, संस्थेचे अध्यक्ष संजय पर्वतकर, विजय शेट शिरोडकर, संजीव नाईक, रुपेश शिरोडकर,जयेश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि पारंपरिक समई प्रज्वलित करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. संस्थेचे संजय पर्वतकर यांनी स्वागत केले. रुपेश शिरोडकर यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com