Goa Police Vehicle Accident: कळंगुटमध्ये पोलिसांच्या गाडीखाली आली गाय; गस्तीवेळी घडली घटना

या घटनेनंतर राज्यातील भटक्या गुरांच्या समस्येने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे
Goa Police Vehicle Accident
Goa Police Vehicle AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Police Vehicle Accident: कळंगुटमध्ये पोलीस गस्त घालत असताना अचानक एक गाय पोलिसांच्या गाडीखाली आली. गाडीच्या पुढील चाकाखाली गाय आल्याने चालकाला नियंत्रण करणे कठीण झाले. यामध्ये गायीच्या जबड्याला जखम झाली आहे.

Goa Police Vehicle Accident
Stray Cattle In Sattari: वाळपईत वाहनचालकांसमोर उद्भवलीय 'ही' समस्या, आठवडी बाजारातही सहन करावा लागतोय त्रास

संपूर्ण माहिती अशी की, आज पहाटे पहाटे 3.30 च्या सुमारास कळंगुटमध्ये पोलीस गस्त घालत असताना ही गाय अचानक त्यांच्या वाहनाखाली आली. यामध्ये ती काही प्रमाणात जखमी झाली आहे.

या अपघातानंतर गायीला सिकेरी येथील गोशाळेमध्ये दाखल करण्यात आले. माहितीनुसार, गायीवर उपचार करण्यात आले असून ती आता सुखरूप आहे.

मात्र या घटनेनंतर राज्यातील भटक्या गुरांच्या समस्येने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. याआधी राज्यात भटक्या गुरांनी हल्ला करण्याचे काही प्रकारही समोर आले होते.

भटक्या गुरांचा मुक्त वावर अन् अपघातांना निमंत्रण! याला जबाबदार कोण?

खूप आधीपासूनच राज्यात भटकी गुरे वाहनचालकांसाठी समस्येचे कारण बनली आहेत. ही गुरे रस्त्यावर ठिय्या मांडून बसत असल्यामुळे अनेकदा अपघातांच्या घटना घडल्या आहेत.

याबाबत संबंधित गुरांच्या मालकांनी आपापल्या गुरांची काळजी घेऊन त्यांना आपल्या गोठ्यात परत नेण्याचे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले होते. तरीदेखील आजही राज्यभरात अनेक ठिकाणी गुरांचे कळप रस्त्यावरच वावरताना दिसत आहेत.

या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता भटक्या गुरांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com