म्हापसा : मागील काही दिवसांत सायबर गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कोणतेही ऑनलाईन व्यवहार करताना शंभर टक्के सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करून उत्तर गोवा पोलिस अधीक्षक शोभीत सक्सेना यांनी सांगितले, की अनोळखींकडे ओटीपी नंबर, क्यूआर कोडची माहिती देऊ नका. कारण, खोट्या संदेशाद्वारे हे सायबर चोर लोकांना ठगत आहेत.
शुक्रवारी म्हापशात पोलिस नागरिक संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. यात व्यापारी, एनजीओ, पंच, शालेय व्यवस्थापक प्रतिनिधी सहभागी झाले होते. व्यासपीठावर आमदार जोशुआ डिसोझा, नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर, उपअधीक्षक जीवबा दळवी, नगरसेवक सुधीर कांदोळकर, साईनाथ राऊळ, आशीर्वाद खोर्जुवेकर, अॅड. शंशाक नार्वेक हे उपस्थित होते.
हे सायबर गुन्हेगार प. बंगाल, हरियाणातून स्वतःची मोडस ऑपरेंडी चालवतात. पोलिस मागावर आहेत. हे लोक कॉलेज तरूणांना हाताशी धरून लोकांना फसवे संदेश पाठवून लुबाडतात. त्यामुळे लोकांनी त्यांना माहिती देऊ नये, असे सक्सेना म्हणाले.
पोलिस व लोकांच्या सूचना
शहरात काही तरुण मुले वाहने मॉडिफाय करीत गाडीचे सायलेन्सर कर्णकर्कश आवाजाचे बनवितात. पोलिसांनी अशांवर कडक कारवाई करून ही वाहनेच जप्त करावीत.
म्हापशातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला. सकाळच्या सत्रात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने ठोस उपाययोजना राबवावी.
बाजारपेठेतील विक्रेत्यांची पडताळणीची आवश्यकता. शिवाय मार्केटच्या प्रवेशद्वारावर कथित वेश्या व्यवसाय चालतो, त्यावर पोलिस कारवाईची मागणी.
सोसायटी व कॉलनीमध्ये तसेच व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन आपापल्या मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.