Kundaim Theft Case : गोव्यातील चोरीप्रकरणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिवसांपूर्वी कुंडई औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाची चोरी झाली होती. याचा पोलिसांनी तपास करत चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.
ही चोरीप्रकरणे सध्या सर्रास वाढली असून यावर आळा घालण्यासाठी गोवा पोलीस प्रशासन सतर्क आहे.
कुंडई आयडीसी वृंदावन पॉलिमर प्रा. लि. कंपनीच्या वेअरहाऊसमधून कच्च्या मालाची चोरी झाल्याची घटना 23 जानेवारीला घडली होती. यामध्ये 501 प्लॅस्टिक कच्च्या मालाच्या बॅग्सचा समावेश असून याची किंमत तब्बल 15,70,000 इतकी होती.
याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये सुजीत गोएला (26), पापू गोएला (22), सुमतलाल गोएला (28), मनोज गोएला (26) या सर्व सिक्युरिटी गार्डना आणि स्क्रॅप डीलर फैजल खान (29), सलमान खान (23), सबीर खान (34) यांना ताब्यात घेतले आहे.
पीआय विजायकुमार चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा छडा लावण्यात आला.
दरम्यान, अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. महाराष्ट्रातील दोघांनी गोव्यातील टॅक्सी चालकाला मारहाण करून त्याच्या वाहनासह पणजी येथून पळ काढला होता. त्यानंतर गोवा पोलिसांची यंत्रणा सज्ज झाली असून त्यांनी निखिल विजय शेट्टी (22) याला सोलापूर, महाराष्ट्र आणि वैभव जव्हेरी (23) याला महाराष्ट्रातील इचलकरंजी येथून आपल्या ताब्यात घेतले आहे.
अॅन्टोनियो रॉड्रिग्स (54) हे सासष्टी येथील रहिवासी असून यांनी या घडल्या प्रकाराबद्दल तक्रार दाखल केली होती. 6 जानेवारी रोजी दुपारी 2.15 च्या सुमारास, दोन अज्ञात व्यक्तींनी आपण ग्राहक असल्याचे सांगत त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यानंतर त्यांची कार घेऊन पळ काढला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.