Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर मद्यपींचा धिंगाणा; टॅक्सीचालकाला मारहाण

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावरील एका पिवळ्या-काळ्या टॅक्सीचालकाला दलालाने मारहाण केल्याने त्याच्या नाकाचे हाड मोडले.
Dabolim Airport
Dabolim AirportDainik Gomantak

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावरील एका पिवळ्या-काळ्या टॅक्सीचालकाला दलालाने मारहाण केल्याने त्याच्या नाकाचे हाड मोडले. या प्रकारानंतर संतापलेल्या टॅक्सीचालकांनी दाबोळी विमानतळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

सोमवारी काही दलाल विमानतळावर आले होते. त्यामुळे काही टॅक्सीचालकांनी त्यांना जाब विचारला तसेच पोलिसांना (Police) बोलाविणार असल्याचे सांगितले. त्यामुळे त्या दलालांपैकी एकाने तुम्हाला दाखवितोच, अशी धमकी देत ते तेथून निघून गेले. मध्यरात्री मनात राग धरलेला तो दलाल पुन्हा टॅक्सी काऊंटरजवळ आला आणि दंगामस्ती करू लागला.

Dabolim Airport
Bomb Threat At Dabolim Airport: दाबोळी विमानतळ; अखेर ‘बॉम्‍ब’ची ती अफवाच

त्यानंतर त्याने ज्या टॅक्सीचालकाने जाब विचारला होता, त्याच्या अंगावर धावून जात त्याला काही कळण्याअगोदरच त्याच्या नाकावर जोरदार मुष्टीप्रहार करून पळ काढला. इतरांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो हाती लागला नाही. यावेळी चालकाच्या नाकाचे हाड मोडले, तसेच काही दातांनाही इजा झाली. त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. इतरांनी त्याला उपचारासाठी नेले.

यापूर्वी, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दलालांची दादागिरी हाणून पाडली होती. मात्र, काही दिवसांनंतर दलालांनी पुन्हा डोके वर काढल्याने प्रवासी आणि टॅक्सीचालक संकटात सापडले आहेत.

दलालांची गुंडगिरी रोखा!

हे दलाल रात्री-अपरात्री मद्यपान, तसेच गांजा सेवन करून येतात. त्यामुळे विमानतळावर भांडणे होतात. यावर योग्य ती कारवाई करण्याची गरज असल्याचे युनायटेड टॅक्सीमन संघटनेचे अध्यक्ष शैलेश मयेकर यांनी सांगितले. दाबोळी विमानतळावरील (Dabolim Airport) विमानांची संख्या कमी झाल्याने आम्हाला भाडे मिळणे कठीण झाले आहे. त्यातच या दलालांची गुंडगिरी सुरू आहे. या दलालांचा बंदोबस्त करण्याची मागणी संघटनेचे उपाध्यक्ष संजय नाईक यांनी केली आहे.

Dabolim Airport
Dabolim Airport : ‘दाबोळी’ विमानतळ सुरूच राहणार; मुख्‍यमंत्र्यांची मोदींसमक्ष गॅरंटी

प्रसाद प्रभुगावकर, माजी सरचिटणीस, टॅक्सीचालक संघटना

दाबोळी विमानतळावर काही दलाल रात्री मद्यपान, गांजा सेवन करून येतात. त्यामुळे त्याचा त्रास टॅक्सीचालकांसह प्रवाशांनाही होतो. दलालांकडून यापूर्वीही टॅक्सीचालकांना मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे यावर कडक कारवाई करावी. भविष्यात अशी घटना घडल्यास गप्प बसणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com