Dudhsagar Jeep Committee: दूधसागर जीप समितीचे माजी अध्यक्ष आणि इतरांविरोधात पोलिस तक्रार!

Dudhsagar Jeep Committee Against Police Complaint: दूधसागर जीप टुर असोसिएशन या कार्यकारी समितीने मागील समितीचे अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांच्याविरुद्ध कुळे पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आलीय.
Dudhsagar Jeep Committee: दूधसागर जीप समितीचे माजी अध्यक्ष आणि इतरांविरोधात पोलिस तक्रार!
Dudhsagar Jeep CommitteeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: ‘जीटीडीसी’चा ऑनलाईन काउंटर जोपर्यंत बंद केला जात नाही व आमची वेबसाईट आम्हाला परत दिली जात नाही, तोपर्यंत दूधसागर पर्यटन हंगाम चालू करण्यास आमचा ठाम विरोध असेल, असा इशारा दूधसागर जीप टूर असोसिएशनने सरकारला दिला होता. दरम्यान आज (21 ऑक्टोबर) दूधसागर जीप टुर असोसिएशन या कार्यकारी समितीने मागील समितीचे अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांच्याविरुद्ध कुळे पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आलीय.

पर्यटकांच्या संख्येत घट!

या संदर्भात बोलताना समितीचे कार्यकारी अध्यक्ष निलेश वेळीप म्हणाले की, जिटीडीसीच्या वाढीव दरामुळे पर्यटकांची संख्या घटली. वेबसाईट आम्हाला परत करावी आणि जिटीडीसी काउंटर बंद करावा अशी मागणी दूधसागर जीप असोसिएशनचे अध्यक्ष निलेश वेळीप यांनी पुन्हा एकदा केली.

Dudhsagar Jeep Committee: दूधसागर जीप समितीचे माजी अध्यक्ष आणि इतरांविरोधात पोलिस तक्रार!
Dudhsagar Tourism: 'दूधसागर' हंगाम चालू होणार की नाही? ‘जीटीडीसी’ काउंटर, वेबसाईटवरुन असोसिएशन आक्रमक

जीटीडीसीचा हस्तक्षेप नको

दूधसागर धबधबा (Dudhsagar Waterfall) पर्यटन व्यवसायाची वेबसाईट आहे, ती आमची वेबसाईट आम्हांला परत द्यावी. या ठिकाणी जीटीडीसीचा हस्तक्षेप नको. सरकारला जो काही कर आहे, तो आम्ही भरण्यास तयार आहे, असे जीप टूर ऑपरेटर्संनी सांगितले. आम्हांला जिटीडीसीचा हस्तक्षेप नको, आम्हांला आपण सहकार्य करावे, अशी मागणी अध्यक्ष निलेश वेळीप व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी केली होती.

Dudhsagar Jeep Committee: दूधसागर जीप समितीचे माजी अध्यक्ष आणि इतरांविरोधात पोलिस तक्रार!
Dudhsagar Waterfall: पर्यटकांसाठी खूशखबर!! सोमवारपासून सुरु होणार दूधसागरसाठी टॅक्सी सेवा

ट्रेकर्सचे म्हणणे काय?

येथे ट्रेकिंगसाठी येणारे ट्रेकर्स सांगतात की, सकाळी 8 ते 10 या वेळेत पर्यटकांना अभयारण्यात प्रवेशाची वेळ असते, ती वेळ अत्यंत चुकीचा असून मोठ्या संख्येने रेल्वेने येणाऱ्या पर्यटकांसाठी ही वेळ बरोबर नाही. कुळे गावात सकाळी 10 च्या नंतर अनेक पर्यटक (Tourists) येतात, प्रवेश बंद झाल्याने त्यांना माघारी फिरावे लागते. तेव्हा वन खात्याने सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत पर्यटकांना अभयारण्यात प्रवेश द्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com