PM Narendra Modi Speech at Opening Ceremony Of National Games 2023 Goa: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 26) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले. फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरु मैदानावर हा उद्घाटन समारंभ रंगला. यावेळी नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात त्यांनी देशात गेल्या तीस दिवसांत झालेल्या कामांची यादी वाचली.
'तरुणांनो लक्ष द्या! लक्ष देऊन ऐका मी तुम्हाला फक्त मागील 30 दिवसांतील कामे सांगतो. गेल्या 30-35 दिवसांत जे काही घडले त्यातून तुम्हाला असे वाटेल की देश या वेगाने पुढे जात असेल, तर तुमचे उज्ज्वल भविष्य मोदींच्या हाती सुरक्षित आहे,' असे यावेळी मोदी म्हणाले.
- नारी शक्ती वंदन कायदा कायदा झाला.
- गगनयानशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली.
- भारताला पहिली प्रादेशिक रॅपिड रेल्वे नमो भारत मिळाली.
- बेंगळुरू मेट्रो सेवेचा विस्तार.
- जम्मू-काश्मीरची पहिली विस्टाडोम ट्रेन सेवा सुरू झाली.
- या 30 दिवसांत दिल्ली-वडोदरा एक्स्प्रेस वेचे उद्घाटन झाले.
- भारतात G-20 देशांच्या खासदार आणि वक्त्यांची परिषद झाली.
- भारतात ग्लोबल मेरीटाईम समिट झाली, 6 लाख कोटी रुपयांचे करार झाले.
- इस्रायलमधून भारतीयांच्या मायदेशी परतण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू करण्यात आले.
- 40 वर्षांनंतर भारत आणि श्रीलंकादरम्यान फेरी सेवा सुरू झाली.
- युरोपला मागे टाकत भारत 5G वापरकर्त्यांच्या बाबतीत जगातील टॉप-3 देशांमध्ये पोहोचला.
- अॅपलनंतर गुगलनेही मेड इन इंडिया स्मार्टफोन बनवण्याची घोषणा केली.
- आपल्या देशाने अन्न आणि फळ-भाजीपाला उत्पादनात नवा विक्रम केला.
- गेल्या 30 दिवसांत तेलंगणामध्ये 6 हजार कोटी रुपयांच्या सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
- छत्तीसगडच्या बस्तरमध्ये 24 हजार कोटी रुपयांच्या आधुनिक स्टील प्लांटचे उद्घाटन करण्यात आले.
- राजस्थानमध्ये मेहसाणा-भटिंडा-गुरदासपूर गॅस पाइपलाइनच्या एका विभागाचे उद्घाटन करण्यात आले.
- जोधपूरमध्ये नवीन विमानतळ टर्मिनल इमारत आणि आयआयटी कॅम्पसची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले.
- गेल्या 30 दिवसांत महाराष्ट्रात 500 हून अधिक कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
- काही दिवसांपूर्वी गुजरातच्या धोर्डोला सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा पुरस्कार मिळाला होता.
- वीरांगना राणी दुर्गावती स्मारकाचे भूमिपूजन जबलपूरमध्ये झाले.
- हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी हळद उत्पादक मंडळ जाहीर.
- तेलंगणात केंद्रीय आदिवासी विद्यापीठाला मान्यता मिळाली.
- मध्य प्रदेशमध्ये 2.25 लाख गरीब कुटुंबांना पीएम आवास योजनेअंतर्गत घरे मिळाली.
- या 30 दिवसांत पीएम स्वानिधी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 50 लाखांवर पोहोचली आहे.
- आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 26 कोटी कार्ड बनवण्याचा टप्पा पार केला आहे.
- आकांक्षी जिल्ह्यांनंतर, देशात आकांक्षी गटांच्या विकासाची मोहीम सुरू झाली.
- गांधी जयंतीला दिल्लीतील एका खादीच्या दुकानात दीड कोटी रुपयांची विक्री झाली.
- आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 100 हून अधिक पदके जिंकली.
- भारतात 40 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सत्र झाले.
- उत्तराखंडला हॉकी अॅस्ट्रो-टर्फ आणि वेलोड्रोम स्टेडियम मिळाले.
- वाराणसीतील आधुनिक क्रिकेट स्टेडियमचे काम सुरू झाले.
- ग्वाल्हेरला अटल बिहारी वाजपेयी दिव्यांग क्रीडा केंद्र मिळाले.
- आणि हे राष्ट्रीय खेळ गोव्यातही होत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.