PM Modi Visit Goa: 'समेस्त गोयकारांक.... ', अन् मडगावात नरेंद्र मोदींनी कोकणीतून केली भाषणाची सुरुवात

PM Modi Visit Goa: गोव्याच्या विकासाला चालना; पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनेक प्रकल्पांचे उद्घाटन
PM Modi
PM Modi Dainik Gomantak
Published on
Updated on

PM Modi Visit Goa: समेस्त गोयकारांक मना काळजा सावन येवकार... गोव्यात येवोन खूप खोस भोगता....मडगावातल्या केटीसी बस स्टॅन्डनजीकच्या मैदानावर झालेल्या सभेत व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही वाक्य उच्चारली आणि उपस्थितांनाची अक्षरशः मने जिंकली.

'विकसित भारत, विकसित गोवा' या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंगळवारी सकाळी गोव्यातील दाबोळी विमानतळावर आगमन झाले.

उद्घाटनांचा सिलसिला:-

भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाद्वारे तसेच फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्‍ट्रीद्वारे बेतुल येथे 6 ते 9फेब्रुवारी दरम्यान इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम सेफ्टीच्या परिसरात भारत ऊर्जा सप्ताह 2024 हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

त्यानंतर त्यांनी 100 एमएलडी पाणी प्रक्रिया प्रकल्पाचा शीलान्यास, एनआयटी संकुल, राष्ट्रीय वॉटर स्पोर्ट्स क्रीडा संस्था, दोनापावला तसेच कुडचडे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन केले.

PM Modi
मडगावातील मोदींच्या सभेला महाराष्ट्रातून जमवली गर्दी, पहिल्यांदाच पंतप्रधानांची बस स्टँडवर सभा - काँग्रेस

भाषणाची सुरुवात कोंकणीतून:-

त्यानंतर दुपारी 2. 45 च्या दरम्यान 'विकसित भारत' या सरकारी कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात गोव्याची राजभाषा कोंकणीतून केली. यावेळी त्यांनी पर्यटन, क्रीडा, पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा यासारख्या विषयांवरुन गोवेकरांसोबत संवाद साधला.

कॉन्फरन्स टुरिझम सुरु करणार :-

पर्यटन आणि खेळांसमवेत गोव्याची प्रतिमा उंचाविण्यासाठी गोव्यात कॉन्फरन्स टुरिझम आणण्याचा आमचा उद्देश असून गोव्याला शैक्षणिक हब म्हणूनही प्रमोट करण्याच्या दृष्टिने आमचे प्रयत्न सुरू असल्याचे मोदींनी आपल्या भाषणातून सांगितले.

तसेच संशोधन आणि शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी 1 लाख कोटीचा निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या सर्व सोयींचा फायदा राज्यातील तरुण आणि उद्योग क्षेत्राला होणार असून यातून गोव्याचे भवितव्य उज्ज्वल असल्याचेही ते म्हणाले.

PM Modi
PM Modi Goa Visit: सेंट झेवियर, गोव्याचा फूटबॉल आणि पर्यटन; मोदींच्या मडगाव सभेतील महत्वाचे 15 मुद्दे

लॉजिस्टिक हब :-

गोव्यात पायाभूत साधनसुविधांचा विकास करण्यासोबतच केंद्र सरकार गोव्याला लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करण्यावर भर देत आहे.

अक्षय ऊर्जेचा वापर करणारा भारत चौथा देश असून 2070 पर्यंत भारत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठणारा देश ठरणार असल्याचे मोदी म्हणाले.

40% ऊर्जेची मागणी बिगर जीवाश्म इंधनाद्वारे पूर्ण केली जात असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सौर उर्जेत 20 टक्क्यांनी वाढ.झाल्याची माहिती मोदींनी दिली.

जातीय सलोखा कौतुकस्पद:-

गोव्यातील जातीय सलोखा कौतुकस्पद आहे. ख्रिश्चन समाजाचे इतर समाजाशी असलेले नाते "एक भारत श्रेष्ठ भारत"चे भक्कम उदाहरण असल्याचे सांगत मोदींनी या सलोख्याविषयी गौरवोद्गार काढले.

शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन क्षेत्रातील 13 हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले असून यामुळे गोव्याच्या विकासाला अधिक चालना मिळणार असल्याची माहिती नरेंद्र मोदींनी यावेळी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com