गोवा भांडवलदारांच्या स्वाधीन करण्यासाठी सरकार योजना आखतंय; मोदी अंबानी, अदानींचे 'प्रधान सेवक'- पाटकर

Goa Politics : काँग्रेस पक्ष भाजप सरकारला दाबोळी येथील विमानसेवा बंद करु देणार नाही.
Goa Politics |  Amit Patkar| PM Modi
Goa Politics | Amit Patkar| PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics Amit Patkar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोहा दौऱ्यानंतर कतार एअरवेजने दाबोळीवरुन मोपा येथे आपली विमानसेवा हलविण्याची घोषणा केली. आता जामनगर विमानतळाला अंबानींच्या विवाहपूर्व सोहळ्यासाठी 10 दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे.

अंबानींच्या कार्यक्रमात कतारचे पंतप्रधान उपस्थित होते. भाजपचे क्रोनी (भांडवलदार) मित्रांवरील प्रेम पुन्हा एकदा उघड झाले आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारचे कॅबिनेट मंत्री माविन गुदिन्हो यांनी जीएमआर दोबोळीतील विमानसेवा मोपा येथे हलवण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणत असल्याचे उघडपणे मान्य केल्यानंतरही मौन बाळगले आहे, असे अमित पाटकर यांनी निदर्शनास आणून दिले. वास्तविक मुख्यमंत्र्यांनी त्यावर खुलासा करण्याची गरज होती असे ते म्हणाले.

केंद्रातील तसेच राज्यातील भाजप सरकार सुंदर गोवा क्रोनी भांडवलदारांच्या स्वाधीन करण्यासाठी जलद गतीने योजना आखत आहे. भाजपच्या धोरणाने शेवटी गोव्यातील पर्यावरणाचा नाश होईल, असा दावा अमित पाटकर यांनी केला.

स्वत:ला ‘प्रधान सेवक’ म्हणवून घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरिबांचे नव्हे तर अंबानी, अदानी, वेदांता, जिंदाल सारख्या श्रीमंत आणि भांडवलदारांचे ‘प्रधान सेवक’ आहेत, असा टोला अमित पाटकर यांनी हाणला आहे.

Goa Politics |  Amit Patkar| PM Modi
Madkai: मडकईत 'पंचायत चलो' कार्यक्रमात वाद; आरजीकडून मंत्री सुदिन यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार

मी उत्तर आणि दक्षिणेतील गोमंतकीयांना आवाहन करतो की, त्यांनी भाजपचा छुपा अजेंडा समजून घ्यावा आणि त्यांच्या कुटील डाव हाणून पाडण्यासाठी सज्ज व्हावे. गोमंतकीय आताच जागे न झाल्यास थोड्याच दिवसांत, गोवा "क्रोनी हब" बनेल, असे अमित पाटकर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोहा भेटीनंतर कतार एअरवेजने दाबोळीवरुन मोपा येथे स्थलांतरित होण्याची घोषणा केली हा निव्वळ योगायोग नाही. त्यानंतर लगेच कतारचे पंतप्रधान जामनगरमध्ये अंबानींच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. गोमंतकीयांनी हा घटनाक्रम लक्षात घ्यावा, असे आवाहन अमित पाटकर यांनी केले आहे.

काँग्रेस पक्ष भाजप सरकारला दाबोळी येथील विमानसेवा बंद करु देणार नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मौन पाळल्यास आम्ही राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा अमित पाटकर यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com