GIDC
GIDCDainik Gomantak

GIDC: औद्योगिक आस्थापनांसाठी उपलब्ध करणार भूखंड

GIDC: लिलाव पुकारणार : 18 लाख चौरस मीटर जमीन देण्यासाठी महामंडळाकडून चाचपणी
Published on

GIDC: येणाऱ्या आर्थिक वर्षात राज्‍य सरकार औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. यासाठी उद्योजकांसाठी भूखंड उपलब्ध कऱण्याची सूचना राज्य सरकारने गोवा औद्योगिक विकास महामंडळाला केली आहे.

GIDC
Corona Case In Goa: सावधान... राज्यात कोरोनाचे! नवे 20 रुग्ण

सध्या बंद पडलेल्या कंपन्यांकडे असलेली १८ लाख चौरस मीटर जमीन यासाठी देता येईल का, याची चाचपणी महामंडळाने सुरू केली आहे. दुसरीकडे गोवा गृहनिर्माण मंडळाने तीन ठिकाणी वाणिज्यिक वापरासाठी भूखंड देण्यासाठी लिलाव पुकारला आहे.

शिवाय, गोवा गृहनिर्माण मंडळाने फोंडा येथे 1 हजार 526 चौरस मीटर, हरवळे येथे 3 हजार 828 चौरस मीटर तर कामुर्ली येथे 2 हजार 247 चौरस मीटरचे वाणिज्यिक वापरासाठीचे भूखंड

5 वर्षांत 605 कंपन्या बंद

राज्यात गेल्या पाच वर्षांत 605 कंपन्या बंद पडल्या आहेत. या कंपन्यांनी विविध औद्योगिक वसाहतींमध्ये भूखंड अडवून ठेवले आहेत. भूखंड हस्तांतरित करण्याची प्रक्रिया क्लिष्ट असल्याने बंद पडलेल्या कंपन्या ताब्यात घेण्यासाठी गुंतवणूकदार पुढे येत नाहीत.

त्या तुलनेत शेजारील महाराष्ट्र व कर्नाटकात औद्योगिक वापरासाठी स्वस्तात जमीन मिळत असल्याने काही उद्योगांनी आपला मोर्चा त्या राज्यांकडे वळवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com