
Step By Step Tourist Guide To Mapusa
म्हापसा: तुम्ही गोव्याची सफर निघाला आहात? तर उत्तर गोव्यातील म्हापसा शहराची सैर नक्कीच झाली पाहिजे. मारुती मंदिरापासून वेगवेगळ्या समुद्रांची रंग, हिल टॉप, नाईट लाईफ अशा एक ना अनेक मजेदार गोष्टी इथे पाहायला आणि अनुभवायला मिळतात. उत्तर गोव्यातलं म्हापसा शहर गजबजलेल्या बाजारपेठा, ऐतिहासिक मंदिरं, चर्च आणि गोव्यातील काही सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखलं जातं आणि म्हणूनच एक दिवस काढून या शहराला भेट दिलीच पाहिजे, पण एका दिवसात संपूर्ण शहर कसं फिरावं? आणि काय पाहावं?
समुद्र किनारे:
खरंतर शहरात असलेले समुद्र किनारे म्हापशाची खरी ओळख आहे. व्हागतोर, हणजूण, बागा, कळंगुट अशा एक ना अनेक किनारी रांगांनी हे शहर परिपूर्ण आहे.
हणजूण किनारा शहरापासून साधारण ८ किलोमीटर दूर आहे. पॅरासेलिंग, जेट स्कीइंग आणि बनाना बोट राईड यांचा आनंद घेता येतो.
व्हागतोर किनारा म्हापसा शहरापासून ९ किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथलं ९ बार आणि हिलटॉप पार्टीसाठी प्रसिद्ध आहे आणि महत्वाचं म्हणजे दिल चाहता हैं या सिनेमाचं शूटिंग सुद्धा इथेच झालं होतं.
बागा समुद्रकिनारा शहरापासून १० किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथे टिटो'ज, मॅम्बोज आणि केप टाउन कॅफे सारखे प्रसिद्ध नाईटक्लब आहेत किंवा तुम्ही इथे पॅरासेलिंग, कयाकिंग आणि विंडसर्फिंगची मजा घेऊ शकता.
कळंगुट हा म्हापशातील प्रसिद्ध किनारा आहे. इथे काही खरेदी नक्कीच करता येते.
म्हापसा बाजार (Mapusa Market)
गोव्यातील सर्वात मोठ्या बाजारांपैकी एक असलेला म्हापसा शुक्रवारचा बाजार खालील गोष्टी शोधणाऱ्या प्रत्येकासाठी एक अवश्य भेट देण्यासारखे ठिकाण आहे:
हस्तकला, दागिने आणि स्मृतीचिन्हे
ताजे सी-फूड, भाज्या आणि मसाले
गोव्याची प्रसिद्ध मिठाई बेबिंका आणि दोदोल
स्थानिक काजू आणि फेणी
धार्मिक ठिकाणं (Religious Places)
समुद्र किनारे, हिलटॉप आणि भल्यामोठ्या बाजाराशिवाय म्हापसा शहर अनेक धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. शहराच्या मध्यभागी असलेलं मारुतीमंदिर किंवा प्रसिद्ध बोडगेश्वर देवस्थान या शहराची शान आहेत. गोव्यातील सर्वात जुन्या चर्चपैकी एक असलेले सेंट जेरोम चर्च १५९४ मध्ये बांधली गेली होती या चर्चमध्ये पोर्तुगीज शैलीची वास्तुकला पाहायला मिळते.
विमान:
मोपा विमानतळ (१५ किमी)
दाबोळी विमानतळ (४० किमी)
ट्रेन:
जवळचे रेल्वे स्टेशन: थिवी रेल्वे स्टेशन
इतर स्टेशन्स: वास्को (४० किमी) आणि मडगाव (४५ किमी)
रस्त्याने:
पणजीहून: १३ किमी (३० मिनिटांचा प्रवास)
मुंबईहून: ५८० किमी ( १०-१२ तास)
स्थानिक वाहतूक: ऑटो-रिक्षा, मोटारबाइक आणि बस
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.