पर्ये, सरकारी माध्यमिक विद्यालय पिसुर्ले व शाळा समूह पिसुर्ले सत्तरी यांच्या संयुक्त विद्यमाने पिसुर्ले पंचायत क्षेत्रात येणाऱ्या सर्व सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवशीय सृजनोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नाट्यकला, संगीत, कथाकथनादी सत्रांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
प्रमुख पाहुणे म्हणून वाळपईचे भाग शिक्षणाधिकारी दिगंबर भजे तर खास अतिथी म्हणून भागशिक्षणधिकारी भालचंद्र भावे यांची उपस्थिती होती. तसेच पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाबलो पर्येकर, पिसुर्ले हायस्कूलचे मुख्याध्यापक उल्हास गावकर व शाळा समूहाचे सचिव नंदा माजीक आदींची उपस्थिती होती.
वाळपईचे भागशिक्षणाधिकारी दिगंबर भजे यांनी शाळा समूहातील मुलांसाठी कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल मुख्याध्यापक उल्हास गावकर यांचे अभिनंदन केले.
त्याचबरोबर अशा कार्यशाळेतून मुलांना वेगवेगळी सृजनशीलता, कल्पकता, आत्मविश्वास यांचा विकासाला वाव मिळतो तसेच याद्वारे मुलांना विविध प्रकारची माहिती मिळते व मुलांचे भाव विश्व सुधारण्यास मदत होते. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक उल्हास गांवकर यांनी केले.
सूत्रसंचालन अपूर्वा परवार यांनी केले. नंदा माजिक यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नाट्यकला सत्र प्रमोद महाडेश्वर, संगीत सत्र महेश गावस, उदय माजिक व शैलेश शिरोडकर, कथाकथन सत्र सरिता नंदा माजीक, विज्ञान प्रयोगसत्र वंदिता फुलारी, हस्तकला सत्र रोहील सातोर्डेकर, वेगवेगळे बैठे खेळांचेसत्र लक्ष्मणराव देसाई यांनी अगदी उत्साहाने घेतले.
मुलांनी या सर्व सत्रांमध्ये अगदी आनंदाने आणि उत्साहाने भाग घेतला. कार्यक्रमाच्या यशासाठी साईश माउसकर, कविता यमकर, तनुजा नाईक व राजेश शिरवाडकर यांचे योगदान लाभले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.