Pilgao: पिळगावात आढळला पहिला ‘नागरी कोकणी शिलालेख’! डॉ. फळगावकर यांचा दावा; मूर्ती विषयक संशोधनास अधिक वाव

Pilgao inscription: नव्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेवेळी ही मूर्ती तलावात विसर्जित करण्यात आली होती. या शिलालेखातील तीन ओळींतील अक्षरे आता पुसट झाल्याने ती स्पष्टपणे वाचता येत नाही.
Shree Kalbhairava sculpture
Pilgao inscriptionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पिळगाव येथे सोळाव्या शतकातील श्री कालभैरवाच्या मूर्तीच्या मागील बाजूस तीन ओळींचा शिलालेख असून तो सोळाव्या शतकातील नागरी कोकणीतील पहिला शिलालेख असल्याचे पेडणे येथील संत सोहिरबानाथ अंबिये महाविद्यालयातील प्राध्यापक तथा इतिहास संशोधक डॉ. रोहित फळगावकर यांनी म्हटले आहे.

डिचोली तालुक्यातील पिळगाव येथील श्री चामुंडेश्वरी मंदिरातील तलावात त्यांना ही मूर्ती सापडली. देवस्थानचे अध्यक्ष तुषार टोपले यांच्या नेतृत्वाखालील मंदिर समितीच्या मदतीने फळगावकर यांनी ही मूर्ती मिळवली.

नव्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेवेळी ही मूर्ती तलावात विसर्जित करण्यात आली होती. या शिलालेखातील तीन ओळींतील अक्षरे आता पुसट झाल्याने ती स्पष्टपणे वाचता येत नाही. परंतु या शिलालेखासंबंधी अधिक संशोधनास वाव असल्याचे त्यांनी सांगितले.

Shree Kalbhairava sculpture
Juje Konkani Movie: जगभर पुरस्कार, गोव्यात मात्र ‘क' वर्ग; ‘जुझे’ सिनेमाच्या श्रेणीवरून नाराजी; ‘ईएसजी'कडून गळचेपीचा दावा

श्री कालभैरवाच्या मूर्तीच्या मागील तीन ओळींमध्ये ‘गोंयें सिंहासमी, गोंए आणि गोंयांत चंडिका’ असे शब्द असून जे शब्द कोकणी लिखाणाला जवळचे आहेत. त्यासोबतच ‘फाल्गुण’ असेही शब्द आहेत जे कोकणी जवळचे आहेत, असे डॉ. फळगावकर यांनी सांगितले.

Shree Kalbhairava sculpture
Konkani Song Viral: ''मणगणे खातो मणगणे'' कनमाणी गाण्याचं कोकणी व्हर्जन व्हायरल; पहा Video

भारतीय पुराभिलेख सर्वेक्षण खात्याचे ॲप्रीग्राफिस्ट यांनी या लेखाचे वाचन करून त्यांनीही हा लेख कोकणी असल्याचे म्हटले आहे.

आतापर्यंत गोव्यात जेवढे शिलालेख सापडले आहेत, त्यात ‘गोवे, गोपक’ असे शब्द आढळले आहेत. परंतु ‘गोंयांत आणि गोंए’ असे पहिल्यांदा शब्द आढळले आहेत. त्यामुळे हा गोव्यात सापडलेला हा पहिला ज्ञात कोकणी शिलालेख आहे. ही मूर्ती १५७९ मध्ये बनवली गेली आणि १५८३ मध्ये स्थापित केली गेली असावी.

डॉ. रोहित फळगावकर, इतिहास संशोधक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com