Sattari News : कुंपण भिंतीवर स्वच्छतेची संदेश चित्रे; नगरगाव पंचायतीचा उपक्रम

शिंगणे युवकांचा आविष्कार
cleanliness message on fence wall
cleanliness message on fence wall Dainik Gomantak

सोमवारी राष्ट्रीय पंचायत दिवस साजरा करण्यात आला आहे. यानिमित्त गोवा पंचायत खात्याने विविध पंचायतींना निवेदने देऊन स्वच्छतेविषयी उपक्रम राबविण्याचे सांगितले होते. त्यानुसार सत्तरी तालुक्यात अनेक ठिकाणी उपक्रम घेतले आहेत.

नगरगाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन पंचायतीच्या कुंपणाच्या भिंतीवर सुरेख, आकर्षक अशी स्वच्छतेचा संदेश देणारी चित्रे रेखाटली आहेत.

शिंगणे गावच्या दत्ताराम गावस, महादेव गावस, आश्वेत गावस, किशोर गावस, आदित्य गावस, मोहन गावस, उमेश गावस, श्रीकांत गावस आदी युवकांनी मिळून ही सुंदरशी चित्रे भिंतीवर साकारली आहेत. त्यामुळे सध्या नगरगावमध्ये प्रवेश करताना भिंतीवरील ही चित्रे मन मोहून घेतात.

cleanliness message on fence wall
Ponda Muncipal Council Election : प्रभाग 12 मध्‍ये तिरंगी लढतीचे संकेत; गाठीभेटी सुरू

"पंचायत खात्याने आम्हाला पत्रव्यवहार करून सूचित केले होते. त्यानुसार नगरगाव पंचायतीने राष्ट्रीय पंचायत दिवसाच्या निमित्ताने हा सामाजिक संदेश देणारा उपक्रम सुरू केला आहे."

विनायक गावकर, सचिव

"शिंगणे गावच्या युवकांनी रेखाटलेली चित्रे एकदम खरीखुरी वाटत आहेत. युवकांनी रात्रीचे काम करून स्वच्छतेचा संदेश चित्रांद्वारे लोकांना दिला आहे. लोकांनी आपला परिसर नेहमीच स्वच्छ व सुंदर ठेवला पाहिजे."

संध्या खाडिलकर, सरपंच, नगरगाव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com