Ponda News : गोवा मराठी अकादमीतर्फै ; 'गदापर्व' नाट्यसंहितेचे अभिवाचन

आरंभी उषा टेंगसे, मेधा देसाई, श्वेता बर्वे, विद्या कळंगुटकर व उर्वी देसाई यांनी नांदी सादर केली.
Gadaparv mythological theater
Gadaparv mythological theaterDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda News : फोंडा,: ‘गदापर्व’ या दामोदर भालचंद्र जोशी यांनी लिहिलेल्या नवीन पौराणिक नाट्यसंहितेचे अभिवाचन नुकतेच राजीव कला मंदिर येथे झाले. गोवा मराठी अकादमीच्या तालुका शाखेने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी व्यासपीठावर लेखक प्रा. रामदास करकडे, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, रंगकर्मी अभय जोग, नितीन कोलवेकर, फोंडा शाखा अध्यक्ष नीलेश नाईक, उदय डांगी, प्रेमानंद नाईक, अॕड. साधना फडके व हनुमंत नाईक उपस्थित होते.

रामदास करकडे म्‍हणाले की, दामोदर जोशी यांनी लिहिलेले हे नाटक उत्तम आहे. भाषा व संवाद दर्जेदार आहेत. याही पुढे अशीच नाटके लिहीत राहावे.

आरंभी उषा टेंगसे, मेधा देसाई, श्वेता बर्वे, विद्या कळंगुटकर व उर्वी देसाई यांनी नांदी सादर केली.

स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष नीलेश नाईक यांनी केले. पाहुण्यांची ओळख आसावरी भिडे करून दिली. अनिल सामंत यांच्या हस्ते समई प्रज्वलन करण्यात आले. रंगकर्मी नितीन कोलवेकर यांनी यावेळी विचार मांडले.

गदापर्व संहिता अभिवचनात नितीन कोलवेकर, विजयेंद्र कवळेकर, राधा गाड, अजयकुमार लोटलीकर, उमेश गावणेकर, संदेश बर्वे, प्रदीप नाईक, ऋषीकेश बेहरे, नीलेश नाईक, महेश शिलकर व निरूपा बांदोडकर यांनी भाग घेतला.

पार्श्वसंगीताची बाजू रतीश गावडे यांनी सांभाळली. त्यानंतर अभय जोग यांनी या नाटकावर भाष्य केले. सूत्रसंचालन ॲड. साधना फडके यांनी केले. आभार प्रेमानंद नाईक मानले. उषा टेंगसे व साथीदारांनी गायलेल्या वंदेमातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com