अखेर रवी नाईकांनी दिला कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा

रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र फोंड्याचे नगरसेवक रितेश नाईक तसेच रॉय नाईक हे यापूर्वीच भाजपवासी झाले आहेत.
Phonda congress MLA given resignation to speaker Rajesh Patnekar
Phonda congress MLA given resignation to speaker Rajesh Patnekardainik gomantak

विधानसभा निवडणूक (gov Assembly elections) जवळ येत असतानाच राज्यातील राजकीय घडामोडींना आणि पक्षांतराला वेग आला आहे. सध्या केंद्रात आणि राज्यातही सत्तेवर असलेल्या भाजपचे सर्वांनाच आकर्षण असून या पक्षामध्ये अनेक दिग्गज प्रवेश करत आहेत. तर काही नेते पक्षाला रामरामही ठोकत आहे. शुक्रवारी गोवा फॉरवर्डचे (Goa forward party) जयेश साळगावकर हे आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपवासी (BJP) झाले, आणि आता फोंड्याचे काँग्रेस आमदार रवी नाईक (Fonda MLA Ravi Naik) यांनी सुद्धा आपल्या आमदारकीचा राजीनामा सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांच्याकडे सुपुर्द केला.

Phonda congress MLA given resignation to speaker Rajesh Patnekar
गोवा भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची पहिली बैठक संपन्न

फोंड्याचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक हे काँग्रेसचे आमदार होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा काँग्रेसशी थेट संबंध राहिलेला नाही. रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र फोंड्याचे नगरसेवक रितेश नाईक तसेच रॉय नाईक हे यापूर्वीच भाजपवासी झाले आहेत. आणि आज सायंकाळी 5. 30. वाजता रवी नाईक देवेंद्र फडणविस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com