Margao News : जनाधार कमी झाल्‍यानेच फळदेसाईंचे आरोप; सावित्री कवळेकर यांचा दावा

Margao News : पक्षश्रेष्‍ठींनी दखल घेण्याची मागणी ; या लाेकसभा निवडणुकीत सावित्री कवळेकर यांनी भाजपविराेधी प्रचार केला, असा आरोप बुधवारी (ता.८) मंत्री फळदेसाई यांनी केला होता. कवळेकर यांचे जवळचे कार्यकर्ते काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करत होते, असे ‘गोमन्‍तक’कडे बोलताना फळदेसाई यांनी म्‍हटले होते.
Savitri kavlekar
Savitri kavlekarDainik Gomantak

Margao News :

मडगाव, समाजकल्‍याणमंत्री सुभाष फळदेसाई हे स्‍वभावाने कसे मग्रुर आहेत, याची सर्वांनाच कल्‍पना आहे. या अशा मग्रुर स्‍वभावामुळेच लोक त्‍यांच्‍यापासून दूर जात आहेत.

त्‍याचा परिणाम या लोकसभा निवडणुकीत होऊन मतांमध्‍ये घट होण्‍याची शक्‍यता आता त्‍यांना दिसू लागली आहे. सांगेत त्‍यांचा जनाधार दिवसेंदिवस कमी होत आहे. त्‍यामुळेच आता ते आपला कमकुवतपणा लपविण्‍यासाठी दुसऱ्याच्‍या डाेक्‍यावर खापर फोडू लागले आहेत, असे प्रत्‍युत्तर सावित्री कवळेकर यांनी दिले आहे.

या लाेकसभा निवडणुकीत सावित्री कवळेकर यांनी भाजपविराेधी प्रचार केला, असा आरोप बुधवारी (ता.८) मंत्री फळदेसाई यांनी केला होता. कवळेकर यांचे जवळचे कार्यकर्ते काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करत होते, असे ‘गोमन्‍तक’कडे बोलताना फळदेसाई यांनी म्‍हटले होते.

त्‍यावर उत्तर देताना कवळेकर यांनी सांगितले की, आपल्‍या चुकांवर पांघरूण घालण्‍यासाठी आता फळदेसाई माझ्‍यावर वृथा आरोप करत आहेत. मला या वादात त्‍यांनी निष्‍कारण ओढले आहे याची पक्षश्रेष्‍ठींनी गंभीर दखल घ्‍यायला हवी, अशीही मागणीही कवळेकर यांनी केली.

दरम्यान, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी आरोप केल्यानंतर सावित्री कवळेकर यांच्या समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे सांगेत तणाव वाढू लागला आहे.

Savitri kavlekar
Goa Traffic Police: गोवा वाहतूक पोलिसांची धडक कारवाई! कदंब बसचालकासह 35 मद्यपींवर कारवाई

सावित्री कवळेकर यांच्या समर्थकांनी लोकसभा निवडणुकीच्या महिनाभर आधीच आपली भूमिका स्पष्ट करताना भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांना पाठिंबा देण्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटून सांगितले होते.

त्यानुसार सावित्री कवळेकर यांच्या समर्थकांनी भाजपला सहकार्य केले असतानाही समाजकल्याणमंत्र्यांनी कवळेकर यांच्यावर आरोप करणे हे चुकीचे असल्याचे कवळेकरांचे समर्थक सिद्धेश प्रभुदेसाई यांनी सांगे येथे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेवक मॅश्‍यू डिकॉस्ता, कुष्टा गावकर, नानू बांडोळकर उपस्थित होते.

मी भाजप उमेदवारासाठी काय केले आहे याची जाणीव भाजप पक्षश्रेष्‍ठींना आहे. त्‍यामुळे अशा अर्थहीन आरोपांना उत्तर द्यावे, असे मला वाटत नाही.

सांगेतील निकालच कुणी कुणासाठी काम केले आहे, हे स्‍पष्‍ट करेल. फळदेसाई यांच्‍या उर्मट स्‍वभावामुळे लोक त्‍यांच्‍यापासून दूर जात आहेत. याचा परिणाम त्‍यांना दिसून आल्‍यामुळेच आता ते माझ्‍यावर आरोप करू लागले आहेत.

- सावित्री कवळेकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com