Goa Petrol Price: गोव्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ...

मंगळवारी पुन्हा एकदा जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.
Goa Petrol Price
Goa Petrol PriceDainik Gomantak
Published on
Updated on

मंगळवारी पुन्हा एकदा जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 91.88 पर्यंत वाढली आहे, तर WTI प्रति बॅरल $ 86.60 वर पोहोचला आहे.

(Petrol-diesel price hike in Goa)

Goa Petrol Price
BSNL ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, केंद्रीय मंत्र्यांनी केली मोठी घोषणा

दुसरीकडे, देशातील सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. काही राज्यांमध्ये किमतीत चढ-उतार दिसून आले आहेत. मात्र, देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये दरात कोणताही बदल झालेला नाही. गोव्यात पेट्रोलचा दर 98.08 लिटर आणि डिझेलचा दर 90.62 लिटर झाला आहे.

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 98.08

  • Panjim ₹ 98.08

  • South Goa ₹ 97.75

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.62

  • Panjim ₹ 90.62

  • South Goa ₹ 90.29

Goa Petrol Price
WhatsApp Banking: या सरकारी बँकेने सुरू केली व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवा...

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

तुम्ही आजची नवीनतम किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता

पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 क्रमांकावर आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत शोधू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com