Cyber Crime: आक्षेपार्ह छायाचित्रे पाठवणाऱ्याला अटक...

सायबर क्राईमची कारवाई : मोबाईल जप्त; बनावट इंस्टाग्राम खात्याद्वारे तरुणीला त्रास
Cyber Crime
Cyber CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर गोव्यातील एका तरुणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते बनवून त्यावर आक्षेपार्ह व अश्‍लील छायाचित्रे पाठवून सतावणूक केल्याप्रकरणी सायबर क्राईम पोलिसांनी मये - साखळी येथील राहुल गंगाराम नाईक (२२) याला अटक केली. संशयित मूळचा चंदगड-कोल्हापूर येथील आहे. हा गुन्हा जामीनपात्र असल्याने न्यायालयाने त्याची सुटका केली. त्याचा मोबाईल जप्त करून तपास सुरू असल्याची माहिती सायबर क्राईम पोलिस निरीक्षक देवेंद्र पिंगळे यांनी दिली.

Cyber Crime
Goa Milk Price: दुधाला 100 टक्के आधारभूत किंमत द्या, दूध उत्पादकांची मागणी..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्राम खात्यावरून एक व्यक्ती अश्‍लील व आक्षेपार्ह छायाचित्रे पाठवून सतावणूक करत असल्याची तक्रार तरुणीने दिली होती. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात आला. त्यानंतर त्याच्या मोबाईलचे लोकेशन शोधत त्याला मये येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याने तक्रारदार तरुणीला इंस्टाग्रामवरून पाठविलेल्या छायाचित्रांची माहिती घेण्यात येत आहे.

तरुणी होती अनभिज्ञ

संशयित राहुल नाईक हा मये येथे राहत असून तो जुने गोवे येथील एका सुपर मार्केटमध्ये सेल्समन म्हणून कामाला होता. तक्रारदार तरुणी या संशयिताला ओळखत होती.

Cyber Crime
President Draupadi Murmu: विद्यार्थ्यांच्या हाती देशाचे भविष्य, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मात्र, इंस्टाग्रामवरून सतावणूक करणारी व्यक्ती ही तोच राहुल नाईक असल्याचे तिला माहीत नव्हते.

अटकेनंतर झाला उलगडा

पोलिसांनी युवकाला अटक केल्यानंतर तक्रारदार तरुणीला संशयित दाखवण्यात आला, तेव्हा तिने त्याला ओळखले. दोघेही एकमेकाला ओळखत होते व त्याचा गैरफायदा घेऊन संशयित तिला ही अश्‍लील छायाचित्रे पाठवत होता, असे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com