Goa Crime News: मद्यपान करुन वाहन चालवल्याबद्दल बेळगावच्या एकाला शिक्षा

म्हापसा जेएमएफसी कोर्टाने बेळगावच्या मूळ रहिवाशाला मोटार वाहन कायदा, १९८८च्या कलम १८५अन्वये मद्यपान करुन वाहन चालवल्याबद्दल दोषी ठरवले
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak

Goa Crime News

म्हापसा जेएमएफसी कोर्टाने बेळगावच्या मूळ रहिवाशाला मोटार वाहन कायदा, १९८८च्या कलम १८५अन्वये मद्यपान करुन वाहन चालवल्याबद्दल दोषी ठरवले आणि १०हजार रुपयांचा दंडा ठोठावला. तसेच हा दंड न भरल्यास आरोपीला ३०दिवस साधा कारावास भोगावा लागणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, ४ फेब्रुवारी रोजी दुपारी २.२३च्या सुमारास बागा सर्कल कळंगुटजवळ मूळचा बेळगावचा रहिवासी असलेला आरोपी केए २१ झेड १३४१ क्रमाकांची गाडी चालवत होता. तेव्हा मोहिमेदरम्यान पोलिसांनी विरुपक्ष तलवार या आरोपीला थांबवले, जो दारु पिऊन गाडी चालवत असल्याचा संशय होता.

त्यानंतर पोलिसांनी त्याची ब्रेथलायझर चाचणी केली असता त्याने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान आरोपीला आरोप समजावून सांगण्यात आले व त्याने गुन्हा कबूल केला.

आरोपीने गुन्हा कबूल केल्याने म्हापसा जेएमएफसी कोर्टाने आरोपीला दोषी ठरवले. आणि त्याला १०हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले. आणि दंड न भरल्यास ३० दिवस साध्या कारावासाची शिक्ष भोगावी लागेल असा आदेश दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com